राहुरी प्रतिनिधी - राहुरी ते रावेर या मार्गावरील महामंडळाची बस मंगळवार पासून सुरु झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जेष...
राहुरी प्रतिनिधी - राहुरी ते रावेर या मार्गावरील महामंडळाची बस मंगळवार पासून सुरु झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी बसचे पूजन करून
बस श्रीरामपुर औरंगाबाद मार्गे रावेर रूटवर मार्गस्थ झाली.सदर बसची वेळ सकाळी ९ वाजण्याची आसुन श्रीरामपूर, औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, भुसावळ मार्गे ही बस रावेरला जाणार आहे.गेल्या चार वर्षापासून राहुरी रावेर बस बंद करण्यात आल्याने औरंगाबाद,सिल्लोड,
भुसावळ,रावेर या ठिकाणी जाणा-या प्रवाशांना श्रीरामपुर येथे जाण्याची वेळ आली होती.राहुरी औरंगाबाद रावेर बस सुरू करावी ही मागणी प्रवाशांकडुन अनेकदा झाली होती.राहुरी बस स्थानक प्रशासनाकडुन या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला होता. आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी राहुरी ते रावेर बस पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी बस स्थानक प्रमुख प्रदिप गलियल, वाहतूक नियंत्रक आयनोर, बाळासाहेब ढोकणे, आयुब शेख,समीर शेख , सुनील पानकर,अमोल पडवळ व प्रवाशी उपस्थित होते.