मुंबई/प्रतिनिधीः ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरिजसारख्या पॉर्न मूव्हीज प्रसिद्ध करणार्या टोळीला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने हातकड्या घातल्य...
मुंबई/प्रतिनिधीः ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरिजसारख्या पॉर्न मूव्हीज प्रसिद्ध करणार्या टोळीला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने हातकड्या घातल्या आहेत. लाखो सबस्क्रायबर्सना सो कॉल्ड ओरिजिनल पॉर्न कंटेण्ट विकून ही टोळी कोट्यवधी रुपये कमवत होती. सबस्क्रिप्शन बेसिसवर दर आठवड्याला पॉर्न मूव्हीज देणार्या या ऑनलाइन टोळीचा कारभार पोलिसांच्या नजरेत आला आणि त्यांनी सापळा रचून तिला अटक केली.
मोबाईल अॅपच्या माध्यमातून पॉर्न फिल्मस प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जायच्या. त्यासाठी लोक यांना सबस्क्रिप्शनचे पैसेही द्यायचे. मुंबई क्राइम ब्रँचने यासंदर्भात सात जणांना अटक केली आहे. त्यामध्ये अशा फिल्म्समध्ये काम करणार्या अभिनेत्याचाही समावेश आहे. अशा पॉर्न कंटेण्टमधून हे लोक कोट्यवधी रुपये कमवत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मुंबई क्राइम ब्रँचने आतापर्यंत केलेल्या तपासात त्यांना अशा 12 मोबाइल अॅप्सची माहिती मिळाली आहे, ज्या अश्लील व्हिडीओ आणि फिल्म्स दाखवतात. दरमहा 199 रुपये सबस्क्रिप्शन घेऊन ते आपले चॅनेल चालवतात. रीतसर कॅमेर क्रू, अभिनेते, तंत्रज्ञ घेऊन या फिल्म्सचे शूटिंग सुरू असते. या शूटिंगच्या जागीच पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या मते, ते पोर्न फिम्ल तयार करत नसून एका बोल्ड लव्ह स्टोरीचे चित्रिकरण करत होते; पण पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना या ठिकाणी स्क्रिप्ट, डायलॉगही सापडले आणि लव्ह स्टोरीपेक्षा हा भलताच कंटेण्ट असल्याचे उघड झाले.