नवी दिल्ली : देशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाल्याने ...
नवी दिल्ली : देशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाल्याने काँग्रेसने एक बैठक घेऊन त्यात निधी उभारण्यावर चर्चा करण्यात आली. निधी उभारण्याासाठी नेत्यांनी जबाबदारी स्वीकारावी, असे आवाह करण्यात आले.
2014 मध्ये देशात सत्ताबदल झाल्यापासून काँग्रेसला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे काँग्रेसने निधी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीच काँग्रेसची एक बैठक पार पडली. त्यात काँग्रेसच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यात आली असून निधी उभा करण्यावर भर देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र, झारखंड आणि पंजाबमधील काही नेत्यांशी चर्चा केली होती. या बैठकीत राज्य सरकारातील मंत्री आणि संघटनेचे काही सदस्य सहभागी झाले होते. या बैठकीत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्यांबाबत चर्चा झाल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते; मात्र मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत पक्षाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सर्व नेत्यांना पक्षाच्या आर्थिक स्थितीची माहिती देण्यात आली. तसेच सर्व सदस्यांना निधी उभारण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. काँग्रेसच्या एका नेत्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दिल्लीत तयार होत असलेल्या पक्षाच्या मुख्यालयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून मुख्यालयाचे काम सुरूच असून अद्यापही ते पूर्ण न झाल्याने काँग्रेस नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.