$type=ticker$snippet=hide$cate=0

बिगुल वाजला

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका व्यवस्थित पार पडल्यानंतर आता चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक पार...



कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका व्यवस्थित पार पडल्यानंतर आता चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक पार पडत आहे. 824 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. अन्य कोणत्याही राज्यापेक्षा पश्‍चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेची निवडणूक आणि रक्तरंजित क्रांती असे पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ठय असते. 

गेल्या काही दिवसांत तेथील राडे पाहिले, तरी पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीचे दिव्य पार पाडणे ही निवडणूक आयोगाची मोठी कसोटी ठरणार आहे. चार राज्ये आणि एका केंद्रशासित राज्यातील निवडणुकीसाठी अगोदरच केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या वेळी पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत घेण्यात आल्या होत्या. या वेळी त्या आठ टप्प्यांत घेतल्या जाणार आहेत. भारतीय जनता पक्षाने या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आता फक्त आसाम राज्य आहे. त्याला गमावण्यासारखे काहीच नाही. पश्‍चिम बंगाल विधानसबेच्या निवडणुकीत दोनशे जागा जिंकण्याचे ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाने तेथील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने तृणमूल काँग्रेसच्या आमदार, खासदारांना कच्छपी लावले आहे. घाऊक पक्षांतरे तिथे सुरू झाली आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यादृष्टीने ही निवडणूक अस्तित्त्वाचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे तिथे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी परस्परांवर हल्ले सुरू केले आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये यापूर्वी स्थानिक पक्षांतच निवडणुकीसाठी रस्सीखेच होत असे. या वेळी भारतीय जनता पक्षासह बाहेरच्या अन्य पक्षांनीही निवडणुकीत रंग भरायला सुरुवात केली आहे. मूलभूत प्रश्‍न बाजूला पडून, मतांचे ध्रुवीकरण आणि भावनिक राजकारणाला महत्व आल्याने पश्‍चिम बंगालमध्ये सातत्याने तणाव निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्य निवडणूक आयोगाने अखेर पश्‍चिम बंगाल, केरळ, तमीळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आसाममध्ये तीन, तर पश्‍चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. केरळ, पुद्दुचेरी आणि तमीळनाडूत प्रत्येकी एका टप्प्यात मतदान होणार असून या पाचही राज्यात दोन मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पाच राज्यातील निवडणुका या अत्यंत आव्हानात्मक आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात आपल्याला नव्या गोष्टींचा अवलंब करावा लागणार आहे. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी-कर्मचारीही कोरोना योद्धयासारखे काम करणार आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.

आसाममध्ये तीन टप्प्यात निडणुका होतील. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. दुसर्‍या टप्प्याचे मतदान एक एप्रिल रोजी होणार आहे. तिसर्‍या टप्प्याचे मतदान सहा एप्रिल रोजी होणार आहे. पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुमारे एक महिनाभर पार पडणार आहे. 27 मार्च, एक एप्रिल, सहा, दहा, 17, 22, 26 व 29 एप्रिल रोजी तिथे मतदान होणार आहे. इंदिरा गांधी आपल्या देशव्यापी प्रचाराची सुरुवात दक्षिणेतून सुरू करायच्या, एवढे काँग्रेसने दक्षिणेला महत्त्व दिले होते; परंतु या वेळच्या निवडणुकीला सामोरे जाताना दक्षिणेत काँग्रेसकडे एकही राज्य नाही, अशी स्थिती पहिल्यांदाच झाली आहे. दुसरीकडे भाजपने मात्र दक्षिण दिग्विजयासाठी दमदार पावले टाकायला सुरुवात केली आहे. सध्या भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असलेल्या आसाममध्ये या निवडणुकीत कुणाचे पारडे जड आहे आणि कोण सत्तेतील सर्वात मोठा दावेदार आहे याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. 2016 मध्ये झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. भाजप 60 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. आसाममध्ये बहुमतासाठी 64 आमदारांची गरज होती. भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 86 जागा जिंकल्या. एका अपक्ष आमदारानेही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारला पाठिंबा दिला. या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव होत सत्तेतील काँग्रेसच्या आमदारांची संख्या 78 वरुन थेट 26 वर आली. भाजपने 26 वरुन 86 वर मजल मारली. काँग्रेसने या वेळी प्रथमच निवडणूक पूर्व आघाडी केली आहे. पाच पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आघाडी भाजपचा कसा मुकाबला करते, हे या निवडणुकीत स्पष्ट होईल. राष्ट्रीय नागरिकत्व कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरून आसाममध्येच मोठे रणकंदन झाले. तिथे आंदोलन सुरू झाले. आसाममध्ये मूलभूत प्रश्‍नांऐवजी तिथे नागरिकत्व कायदा, नागरिकत्व नोंदणी हेच मुद्दे जास्त चर्चिले जातील. केरळमध्ये 140 जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. याठिकाणी बहुमतासाठी 71 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2016 च्या निवडणुकीत डाव्यांनी 83 जागांवर विजय मिळवला होता तर यूडीएफने 47 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे भाजपची मात्र पुरती धुळधाण झाली होती. 98 जागांपैकी फक्त एका जागेवर भाजपचा विजय झाला होता.

केरळच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पिनराई विजयन यांनी यशस्वीरित्या सांभाळला. केरळात सीपीआय (एम)च्या नेतृत्वाखाली लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचे म्हणजेच (एलडीएफ) चे सरकार आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्यांनी आपली पकड कायम ठेवली. शहरी भागात काँग्रेसचे वर्चस्व राहिले. भाजपच्या जागा वाढल्या असल्या, तरी त्यामुळे केरळमध्ये लगेच सत्ता येईल, असे नाही. मेट्रो मॅन ई श्रीधरन यांनी भाजपत प्रवेश घेतला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री होण्याची भाषा केली आहे. अर्थात भाजपकडे तिथे चेहरा नाही. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार केरळात 39 पक्ष निवडणूक लढवत आहेत. यामध्ये बसप, भाजप, सीपीआय, सीपीआय (एम), इंडियन नॅशनल काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष तसेच प्रादेशिक पक्षाबाबत बोलायचे झाल्यास इंडियन युनियन मुस्लिम लिग, जनता दल, जनता दल सेक्युलर, केरळ काँग्रेस हे पक्ष आहेत. पुद्दुचेरीतील काँग्रेस सरकार कोसळले. आमदारांनी साथ सोडल्याने मुख्यमंत्री व्ही. नारायण स्वामी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाची ही अवस्था दयनीय आहे. काँग्रेसवर अशी वेळ आणीबाणीनंतरही आलेली नव्हती, जी आता आहे. उलट तेव्हा दक्षिण भारतानेच काँग्रेसला आधार दिला होता. सध्या काँग्रेसची फक्त पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता कायम आहे. काँग्रसचे आमदार लक्ष्मीनारायण आणि डीएमकेचे आमदार वेंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यापूर्वी काँग्रेसच्या चार आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला होता. या आमदारांच्या राजीनाम्यामुळे 33 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आमदारांची संख्या घटून 10 झाली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या 14 झाली आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच पुद्दुचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळले. तमीळनाडूत करुणानिधी आणि जयललिता यांच्या अनुपस्थितीत प्रथमच निवडणूक होत आहे. अण्णाद्रमुक आणि भाजपची युती झाली आहे. काँग्रेस आणि द्रमुकची युती आहे. शशिकला तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. त्यामुळे अण्णाद्रमुकत फूट पडण्याची शक्यता आहे. दिनकरन आणि शशिकला यांच्यामुळे अण्णाद्रमुकची अडचण झाली आहे. दर पाच वर्षांनी सत्तांतर हा तमीळनाडूतला नियम गेल्या दहा वर्षांपूर्वी मोडला होता. तो पुन्हा प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.

Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra satara,17,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11221,औरंगाबाद,382,क्रीडा,681,दखल,776,देश,4662,नगर,1,नाशिक,836,पुणे,947,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17976,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,7,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15383,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4336,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1700,सातारा,3225,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बिगुल वाजला
बिगुल वाजला
https://1.bp.blogspot.com/-Sw-FfkTCBNY/YDo77SHYm7I/AAAAAAABooA/rs645Bm3jao922ExOI65uRxfvZgM2YkpQCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-Sw-FfkTCBNY/YDo77SHYm7I/AAAAAAABooA/rs645Bm3jao922ExOI65uRxfvZgM2YkpQCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_120.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_120.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content