शिराळा / प्रतिनिधी : काळामवाडी, ता. शिराळा येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये पडलेल्या बैलाला वाचवण्यासाठी मालक तब्बल अडीच ता...
शिराळा / प्रतिनिधी : काळामवाडी, ता. शिराळा येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये पडलेल्या बैलाला वाचवण्यासाठी मालक तब्बल अडीच तास बैलासह पाण्यात पोहत राहिला. अखरे जेसीबी आणून जीव वाचवण्याचा हा थरार अडीच तासाने संपुष्टात आला. अन सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला
याबाबत समजलेली माहितीअशी, काळामवाडी येथील सखाराम पाटील आपल्या मुलासह बैलांना घेऊन गावच्या जॅकवेल जवळ धुण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी बैल धुत असताना रस्त्यावरील वाहनास बैल बुजून उडी मारल्याने तो जॅकवेलमध्ये पडला. त्या जॅकवेलला पायर्या नसल्याने व पाणीही खोल असल्याने बैलास बाहेर काढणे अवघड झाले होते. बैल बुडू लागला होता त्यास वाचवण्यासाठी सखाराम यांचे चिरंजीव रुपेश याने जॅकवेलमध्ये उडी मारून बैलांसह पोहत त्याने बैलाचे तोंड वरती धरले. तो अडीच तास पाण्यात पोहत राहीला. त्यावेळी पणुंब्रे वारुण येथील नितीन ढेरे यांचा जेसीबी आणून बैलास सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे ग्रामस्थ व पाटील कुटूंबियांनी सुटकेचा श्वास सोडला. बैल जॅकवेलमध्ये पडल्याची घटना समजताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. बैलास बाहेर काढण्यासाठी किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे, उपसरपंच आनंदा सावंत, सतीश किनारे, संतोष पाटील, शामराव चव्हाण, प्रकाश सोंडुलकर यांच्यासह ग्रामस्थांनी मदत केली.