$type=ticker$snippet=hide$cate=0

‘चक्का जाम’ला देशभर प्रतिसाद; कायदे परत न घेतल्यास ऑक्टोबरपर्यंत आंदोलनाचा पवित्रा

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता देशभरात शेतकर्‍यांनी पुकार...

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता देशभरात शेतकर्‍यांनी पुकारलेल्या चक्का जामला चांगला प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलकांनी रस्त्यावर येत वाहतूक रोखली. आंदोलकांनी पंजाब, हरयाणात जाणारे महामार्ग बंद केले. गाझीपूर बॉर्डरवरही शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले असून, देशातील शेतकर्‍यांना मातीशी जोडू, नव्या युगाचा जन्म होईल, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर म्हटले, दरम्यान, कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम राहताना महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.  


    चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना टिकैत म्हणाले, की हे जनआंदोलन आहे. भाकरी तिजोरीत बंद होऊन नये, म्हणून हे आंदोलन आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही गोंधळ घालणारे होते, त्यामुळे तिथे चक्का जाम करण्यात आलेला नाही. आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही ऑक्टोबरपर्यंत इथेच बसून आहोत. ‘चक्का जाम’च्या काळात अत्यावश्यक सेवेतील आणि शाळेच्या बस व रुग्णवाहिकांना जाऊ देण्यात आले. दिल्लीच्या सीमेवर तिन्ही आंदोलन ठिकाणाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. ‘चक्का जाम’आंदोलन सुरू झाल्यानंतर काही आंदोलकांनी बंगळूरमधील येलहांका पोलिस ठाण्यासमोर येऊन धरणे देण्यास सुरुवात केली. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणामध्ये सुरुवातीपासूनच रोष उमटताना दिसत आहे. आजच्या ‘चक्का जाम’आंदोलनाला पंजाबमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. संगरूर जिल्ह्यातील मूनाक-तोहना महामार्गावर पहिलांनी ठिय्या देत वाहतूक रोखली. ‘चक्का जाम’जम्मूमध्येही प्रतिसाद मिळला. आंदोलकांनी रस्त्यावर येत जम्मू-पठाणकोट महामार्ग रोखला. कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकर्‍यांनी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती. पुण्यातही आंदोलन करण्यात आले. हडपसर येथील शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन केले. आता हे आंदोलन आणखी लांबण्याची चिन्हे आहेत. आम्ही आता येथून उठणार नाही. कृषी कायदे रद्द करण्यासाठी आम्ही सरकारला दोन ऑक्टोबरपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने तोपर्यंत निर्णय घेतला नाही, तर आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असा इशारा टिकैत यांनी दिला.



जिथे खिळे ठोकले, तिथे फुले लावणार

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर मोठे खिळे ठोकून आणि सिमेंटच्या भिंती उभारुन खबरदारी घेतली होती; पण पोलिसांची ही खबरदारी केंद्र सरकारच्या अंगाशी आली आहे. खिळे ठोकलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देश-विदेशातून मोदी सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यामुळे रस्त्यांवर ठोकलेले खिळे अखेर पोलिसांना काढावे लागले; पण आता खिळे ठोकलेल्या जागेवरच फुले लावणार असल्याची घोषणा टिकैत यांनी केली आहे. त्यासाठी दोन ट्रक माती मागवल्याचेही त्यांनी सांगितले.


ग्रेटा थनबर्ग आणि रिहानाला ओळखत नाही

ग्रेटा थनबर्ग आणि पॉपस्टार रिहाना यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याचे टिकैत यांनी स्वागत केले; पण आपण या दोघींनाही ओळखत नसल्याचे ते म्हणाले. हे आंतरराष्ट्रीय कलाकार कोण आहेत? त्यांनी आमचे समर्थन केले असले, तरी मी त्यांना ओळखत नाही, असे टिकैत यांनी पत्रकारांना सांगितले. 


जय जवान, जय किसानच्या घोषणा

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांचे वेगळेच रुप पहायला मिळाले. गाझिपूर बॉर्डरवर आंदोलन करणार्‍या टिकैत यांनी त्यांचा मार्ग रोखणार्‍या पोलिसांसमोर हात जोडूले आणि जय जवान, जय किसानच्या घोषणा दिल्या. तसेच आपण सर्वजण भाऊ-भाऊ आहोत असेही ते पोलिसांना म्हणाले.


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10358,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,709,देश,4454,नाशिक,805,पुणे,751,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16509,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13753,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3731,विदेश,653,संपादकी,2,संपादकीय,1558,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ‘चक्का जाम’ला देशभर प्रतिसाद; कायदे परत न घेतल्यास ऑक्टोबरपर्यंत आंदोलनाचा पवित्रा
‘चक्का जाम’ला देशभर प्रतिसाद; कायदे परत न घेतल्यास ऑक्टोबरपर्यंत आंदोलनाचा पवित्रा
https://c.ndtvimg.com/2021-02/6cuhmbeo_chakka-jam-farmers-protest-palwal-ndtv-650_650x400_06_February_21.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_127.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_127.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content