$type=ticker$snippet=hide$cate=0

स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला होणार फाशी

  लखनऊ : स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील तुरुंगामध्ये मूळच्या अमरो...

 

लखनऊ : स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील तुरुंगामध्ये मूळच्या अमरोहा येथे असणार्‍या शबनमला फासावर लटकवण्यात येणार आहे. शबनमला फाशी देण्यासंदर्भातील तयारी तुरुंग प्रशासनाने सुरू केली आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देणार्‍या मीरतच्या पवन जल्लादनेही या तुरुंगामधील फाशीघराची दोन वेळ पहाणी केली आहे. फाशीची तारीख निश्‍चित करण्यात आलेली नसली, तरी तुरुंग प्रशासनाची तयारी सुरू आहे. 


शबनमने 2008 मध्ये प्रियकर सलीमच्या मदतीने स्वत:च्या सात नातेवाइकांवर कुर्‍हाडीने हल्ला करून त्यांची हत्या केली. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शबनमला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. राष्ट्रपतींनीही शबनमचा दयेचा अर्ज स्वीकारलेला नाही. अमरोहामधील हसनपूरजवळ असणार्‍या बावनखेडी गावात राहणार्‍या शबनमने सलीमच्या मदतीने 2008  मध्ये 14 आणि 15 एप्रिलच्या मध्यरात्री आपल्या घरातील सात जणांची हत्या केली. यामध्ये शबनमचे वडील मास्टर शौकत, आई हाश्मी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिनी अंजूम आणि तिची बहीण रबीया या सहा जणांना समावेश होता. शबनमने नंतर आपल्या लहान भाचालाही गळा आवळून मारुन टाकले. सलीमसोबत असणार्‍या आपल्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध असल्याने शबनमने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. अमरोह येथील न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी दोन वर्षे तीन महिने चालली. त्यानंतर 15 जुलै 2010 रोजी जिल्हा न्यायालयातील न्यामूर्ती एस. ए. ए. हुसैनी यांनी शबनम आणि सलीमला फाशीची शिक्षा सुनावली. शबनम आणि सलीम प्रकरणासंदर्भात तब्बल शंभर दिवस न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने 29 साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेतले. 14 तारखेला साक्षीदार आणि पुरावे सादर करून झाल्यानंतर पुढच्या दिवशीच अवघ्या 29 सेकंदांमध्ये न्यायालयाने दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणामधील सुनावणीदरम्यान एकूण 29 जणांनी 649 प्रश्‍न विचारले. 160 पानांचा निकाल न्यायालयाने दिला होता. मथुरेतील तुरुंगामध्ये 150 वर्षांपूर्वी महिलांना फाशी देण्यासाठी हे विशेष फाशीघर तयार करण्यात आले; मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर शबनमला लगेच फासावर चढवण्यात येईल. 


दुरुस्ती आणि रस्सी

तुरुंग अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पवन जल्लादनेही दोन वेळा फाशीघर पाहिले आहे. जल्लादने फाशी देण्यात येणार्‍या ठिकाणी असणारा खटका आणि काही गोष्टींमध्ये दोष असल्याचे निरीक्षण नोंदवल्यानंतर त्यासंदर्भातील डागडुजी केली जात आहे. बिहारमधील बक्सरमधून शबनमला फाशी देण्यासाठी वापरण्यात येणारी रस्सी मागवण्यात येणार आहे.


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10353,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,708,देश,4453,नाशिक,805,पुणे,749,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16498,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13741,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3727,विदेश,652,संपादकी,1,संपादकीय,1556,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला होणार फाशी
स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला होणार फाशी
https://lokshahilive.com/wp-content/uploads/2021/02/New-Project-12-7.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_139.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_139.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content