मुंबई : राज्यात तीन ठिकाणी भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. कराड, माळशेज घाट आणि पाटण ...
मुंबई : राज्यात तीन ठिकाणी भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. कराड, माळशेज घाट आणि पाटण तालुका या तीन ठिकाणी घटना घडली आहे. पुण्याहून कोल्हापूरला कुस्ती परिषदेसाठी गेलेल्या पैलवानांच्या गाडीला परत जाताना कराडजवळ पहिला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून तीन जण जखमी आहेत.
जखमींवर कराडच्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहे. राहुल दोरगे (वय 28), स्वप्निल शिंदे (व
य 28), रविराज साळुंखे (सर्व रा. कात्रज, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. मृत्यू पावलेले आणि जखमी झालेले पैलवान पुण्यातील कात्रजच्या गोकुळ वस्ताद तालमीचे असल्याचे समजते. पुणे-बंगळुरु महामार्गावर कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली. पुणे-बंगळुरु महामार्गावर कराडजवळ इनोव्हा आणि स्विफ्ट कारमध्ये जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कार रस्त्यालगतच्या नाल्यातून जात बाजूच्या झाडावर आदळल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी कराड येथील सह्याद्री रुग्णालयात पाठविले.माळशेज घाटात खासगी बसला दुसरा अपघात झाला. माळशेज घाटात आंब्याच्या वळणावर हा अपघात झाला. या बसमध्ये एकूण 16 प्रवासी होते. त्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. अपघातातील काही जखमींना आळेफाटा येथील माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही जखमींना उपचारासाठी कल्याणला पाठविण्यात आल्याची माहिती मिळतेय. बस अष्टविनायकाचे दर्शन करुन उल्हासनगरला जात असताना चालकाला वेगाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.तिसरा अपघात पाटण तालुक्यातील सडावाघापूर येथील वनकुसवडे पठारावार एसटी बसला झाला. यात 12 जण जखमी झाले असून यात एसटी चालक वाहकाचाही समावेश आहे. जखमींवर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.