नागपूर : कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून नागरिक मास्क वापरताना दिसून येत नाही. त्यामुळे राज्यसरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याची शक्यता ...
नागपूर : कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून नागरिक मास्क वापरताना दिसून येत नाही. त्यामुळे राज्यसरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. नागरिक अजूनही विना मास्कचे फिरत आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र असंच सुरु राहिलं तर आगामी काळात कठोर निर्णय घ्यावे लागतील.