$type=ticker$snippet=hide$cate=0

परवडणार्‍या घरावरील करसवलतीला मुदतवाढ

 स्थावर मालमता क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. विशेषतः परवडणार्‍या घरांसाठीच्या कर्जावरील कर सवलत ...

 स्थावर मालमता क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. विशेषतः परवडणार्‍या घरांसाठीच्या कर्जावरील कर सवलत वाढवण्यात आली आहे. तसेच परवडणार्‍या घरांचे प्रकल्प हाती असलेल्या बिल्डरांना आणखी एक वर्ष कर सवलत मिळणार आहे. गेल्या वर्षात कोरोनाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता. यात स्थावर मालमत्ता क्षेत्रदेखील होरपळून निघाले; मात्र टाळेबंदीनंतर घर खरेदीमध्ये वाढ दिसून आली होती. ही वाढ कायम राहावी, स्थावर मालमत्ता क्षेत्रात सकारात्मकता राहावी, यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी सवलतीची मागणी केली होती


. त्यानुसार आज सीतारामण यांनी अर्थसंकल्पात घर खरेदीदारांसाठी आणखी एक संधी दिली आहे. वाजवी दरातील घरांवर असलेली कर सवलत आणखी एक वर्ष वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय रेंटल हाऊसिंगची कर सवलत वाढवण्यात आली आहे. परवडणार्‍या घरांसाठीच्या गृहकर्जावरील व्याजावर सध्या दीड लाख रुपयांची अतिरिक्त कर वजावट आहे. ही योजना 31 मार्च 2021 रोजी समाप्त होणार होती; मात्र गेल्या वर्षभरात कररोना संकट आणि टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था ठप्प होती. त्यामुळे सर्वंच क्षेत्रातील उलाढाल थांबली. परिणामी या सवलत योजनेला मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सीतारामण यांनी ही योजना 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. प्राप्तिकर 80 आयबीए नुसार परवडणार्‍या गृह प्रकल्पांनादेखील प्राप्तिकर सवलत देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी घर खरेदी करावी, यासाठी अंदाजपत्रकात विशेष लक्ष देण्यात आले. रिअल्टी सेक्टरला गृहनिर्माण आणि जीएसटीच्या सवलतीवरील करात सूट मिळण्याची अपेक्षा आहे. 2020 मध्ये सरकार आणि रिझर्व्ह बँकेने तरलता वाढवण्यासाठी अनेक उपाय जाहीर केले, त्यात मोठ्या प्रमाणात रेपो दर कपातीसह 140 बेसिस पॉइंटपर्यंत कपात केली गेली. त्यामुळे निम्नस्तरीय गृहकर्जाचे व्याज दर नोंदले गेले. 30 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीच्या घरांच्या स्वस्त कर्जासाठी देण्यात येणार्‍या गृहकर्जाकरिता तसेच रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना निधी देण्यासाठी एलटीव्ही (लोन टू व्हॅल्यू) रेशो 90 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती; परंतु ती फलद्रुप झाली नाही.

Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10355,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,708,देश,4453,नाशिक,805,पुणे,749,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16501,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13744,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3727,विदेश,652,संपादकी,1,संपादकीय,1556,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: परवडणार्‍या घरावरील करसवलतीला मुदतवाढ
परवडणार्‍या घरावरील करसवलतीला मुदतवाढ
https://img.etimg.com/thumb/width-1200,height-900,imgsize-39732,resizemode-1,msid-80629226/wealth/personal-finance-news/affordable-housing-gets-further-support-as-tax-holiday-extended-by-1-year.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_15.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_15.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content