मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस पडेल असा इशारा स्कायमेटने दिला आहे. या अवकाळी पावसाचा फटका, महाराष्ट्...
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस पडेल असा इशारा स्कायमेटने दिला आहे. या अवकाळी पावसाचा फटका, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडीशा, झारखंड, छत्तीसगड, तेलंगाणा आणि तामिळनाडूला बसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान थंडीच्या काळात पुन्हा अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजासाठी मात्र ही चिंतेची बाब ठरणार आहे.