$type=ticker$snippet=hide$cate=0

शक्तीशाली सरकार एवढं का घाबरलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लोकसभा, राज्यसभेत बहुमत आहे. विरोधक गलितगात्र आहेत. सरकार म्हणतं, त्याप्रमाणं एकट्या पंजाब राज्यातील ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लोकसभा, राज्यसभेत बहुमत आहे. विरोधक गलितगात्र आहेत. सरकार म्हणतं, त्याप्रमाणं एकट्या पंजाब राज्यातील श्रीमंत शेतकर्‍यांचं आंदोलन आहे, तर मग सरकारला एवढं घाबरायचं काहीच कारण नाही. पर्यावरणवादी कार्यकर्ती एक ट्विट करते आणि सरकार लगेच गुन्हा दाखल करतं. दिल्लीच्या सीमेवर ज्या पद्धतीचा बंदोबस्त करण्यात आला आहे, आंदोलकांची ज्या पद्धतीनं छळवणूक सुरू आहे, ते पाहता आणीबाणीच्या काळातही इतका कडेकोट बंदोबस्त करण्यात आला नव्हता, असे जुने जाणते लोक सांगतात. 

भारतात मोठमोठी आंदोलनं झाली. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तर परकीयांविरोधात मोठं आंदोलनं झालं. काही वेळा आंदोलकांवर ब्रिटिशांनी गोळ्या चालविल्या; परंतु आपल्याच सरकारविरोधात आंदोलन करणार्‍यांना ज्या परिस्थितीला सध्या तोंड द्यावं लागतं, ती परिस्थिती यापूर्वी कधीच आली नव्हती, असं दिल्लीच्या एका माजी पोलिस प्रमुखानंच लिहिलेल्या एका लेखात नमूद केलं आहे. दिल्लीच्या सीमांवर ज्या प्रकारचं बॅरिकेडिंग करण्यात आलं, ते अभूतपूर्व आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही आपल्या देशात याहून अधिक हिंसक आंदोलनं व दंगली झाल्या आहेत; मात्र, यापूर्वी कधीही पोलिसांनी राजधानीचं रूपांतर मध्ययुगीन किल्ल्यात किंवा भिंतीआडच्या शहरात करण्याचा प्रयत्न केला नाही. चर्चेचे दरवाजे उघडे ठेवण्याऐवजी भिंतीच बंद करून घेतल्या जात असतील, तर मग आंदोलनातून मार्ग कसा निघायचा? कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत बोलताना एकट्या पंजाब राज्यातील शेतकर्‍यांचं हे आंदोलन आहे. दिल्लीच्या सीमेवर काही हजारांत शेतकरी असतील. 130 कोटी लोकसंख्येच्या देशांत काही हजार शेतकरी, ते ही एका राज्याचे असतील, तर त्यांची सरकारला एवढा बंदोबस्त करण्याइतकी भीती का वाटावी, याचं उत्तर गोंधळलेल्या सरकारकडं नाही. क्रेन्स वापरून रस्ते खणलं, त्यांवर लोखंडी सळ्या आणि अणकुचीदार खिळे सिमेंटचा वापर करून रोवणं, अडथळ्यांचे अनेक स्तर रचणं, दोन अडथळ्यांमध्ये काँक्रिट लिंपणं, अडथळे वाढवण्यासाठी वाद्यांच्या तारा आणि खडक टाकणं ही सरकार घाबरल्याची नाही, तर कशाची लक्षणं आहेत. फार टीका झाल्यानंतर अणकुचीदार खिळे काढण्यात आले; परंतु तोपर्यंत जी छी थू व्हायची, ती होऊन गेली होती. कायदा व सुव्यवस्था हाताळताना जमावाला विशिष्ट दिशेनं वळवण्यासाठी, जमावातील लोकांची एकमेकांशी टक्कर होणं टाळण्यासाठी आणि जमावाच्या प्रत्यक्ष संपर्कात येणार्‍या पोलिसांच्या संरक्षणासाठी बॅरिकेडिंगची गरज भासते. बॅरिकेडिंग हा कायमच तात्पुरत्या स्वरूपाचा उपाय समजला जातो. अपवाद वगळता पोलिस एखादा रस्ता कायमस्वरूपी ब्लॉक करून किंवा खणून नागरिकांच्या हक्कांवर अतिक्रमण करू शकत नाहीत. हा रस्ते खणण्याचा, खिळे रोवण्याचा प्रकार सार्वजनिक मालमत्तेची हानी करणं समजले जातं आणि हे सगळे पूर्ववत करण्यासाठी जास्तीचा खर्चही करावा लागतो. मग दिल्लीत हे सगळे उद्योग करायला कोणत्या कायद्यानं परवानगी दिली? दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेडिंग नाहीच; ही तटबंदी आहे. तटबंदीचा वापर केवळ घुसखोरी प्रभावित भागांतच, घुसखोरांपासून सुरक्षा कर्मचार्‍यांचं संरक्षण करण्याच्या हेतूनं केला जातो. या पार्श्‍वभूमीवर आंदोलक शेतकरी घुसखोर आहेत, असं सरकारला  वाटतं का, याचं उत्तर दिलं पाहिजे. लोकशाहीत तटबंदीला जागाच नाही. तटबंदी हा सरंजामशाहीच्या युगाचा अवशेष आहे. शोषित प्रजेच्या रागाचा कधीही उद्रेक होऊ शकतो, या भीतीतून अत्याचारी राज्यकर्ते अशा तटबंद्यांच्या आतमध्ये राहत होते. पोलिस अशा प्रकारची आंदोलनं हाताळण्यासाठी तटबंदी बांधू लागले, तर त्याचे दोनच अर्थ निघतात. एक म्हणजे सत्ताधार्‍यांना जनतेची भीती वाटत आहे किंवा दुसरा म्हणजे सत्ताधारी जनतेला शत्रू समजत आहेत. दोन्हीही अर्थ काढले, तरी त्यात सरकारचंच नुकसान आहे. 26 जानेवारी रोजी झालेल्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर, आंदोलकांनी कोणत्याही स्वरूपाचा मोर्चा काढणं टाळावं आणि आंदोलनाचा हक्क त्यांना लोकशाहीनं दिलेला असला तरी सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंदोलन झालं पाहिजे हे आंदोलकांना समजावून सांगण्यासाठी चर्चेचा मार्ग का अवलंबला जाऊ शकत नाही? काही पोलिसांनी धातूचा पाइप्ससारखे दिसणारे फोरआर्म गार्ड घेतलेले काही फोटोंमध्ये दिसलं. पोलिसांनी वापरलेल्या कोणत्याही शस्त्राला गृहमंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे आणि ही मंजुरी पोलिस संशोधन व विकास कार्यालयानं (बीपीआरअँडडी) अभ्यासांती केलेल्या शिफारशीवरून दिली जाऊ शकते. या धातूच्या पाइप्ससाठी अशी कोणतीही मंजुरी घेतलेली नाही, याचा अर्थ ती अनियमित आणि बेकायदा शस्त्रं आहेत. पोलिकार्बोनेट पाइप लवचिक असल्यानं तो बहुतांश परिणाम स्वत: शोषून घेतो आणि त्यामुळं वरवर मार बसतो. मात्र, प्राणघातक ठरू शकणारे मेटल पाइप्स पोलिस कसे वापरू शकतात? आंदोलकांकडं तलवारी होत्या, असा युक्तिवाद करून स्टीलच्या काठ्या घेणं हा त्यावरचा उपाय नाही. यावर उपाय कायद्याचा वापर हाच आहे. आंदोलनं हाताळण्याचे अन्य अनेक मार्ग आहेत. या तटबंद्या मात्र शेतकर्‍यांना अमानवी स्वरूपात रंगवण्यासाठी रचलेल्या कारस्थानांसारख्या आहेत. हे शेतकरी राजधानीतील शांतता उधळून लावण्याच्या उद्देशानंच आले आहेत असं चित्र उभं करण्याचा हा प्रयत्न आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन करत असताना, पोलिसांशी संघर्ष सुरू असताना शेतकर्‍यांची इंटरनेट सुविधा काढून घेतली असं वृत्त प्रसिद्ध झालं. त्या वृत्तावर रिहानानं, ‘या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत का?’ असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यानंतर रिहानाचं ट्विट काही तासांत जगभरात एक लाखाहून अधिक जणांनी रिट्विट केलं व दोन लाख जणांनी ते ‘लाइक’ केलं. रिहानाच्या ट्विटचा परिणाम एका ऊर्जेसारखा सोशल मीडियात दिसून आला. ब्रिटनचे खासदार क्लॉडिया वेब, तमन्नजीत सिंग धेसी, अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य जिम कॉस्टा, हवामान बदलावर जगभर जागृती करणारी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाबाबत सहानुभूती दाखवली व त्याचं समर्थन केलं. रिहानाच्या ट्विटनंतर मीना हॅरीस यांनी फॅशिस्ट हुकूमशहांच्याविरोधात मौन बाळगल्यांबद्दल सावधानता हवी असं मत व्यक्त केलं. मीना हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या भाची असून त्या लोकप्रिय लेखक आहेत. वास्तविक, रिहानाच्या ट्विटमुळं तसा फरक पडायला नको होता; पण जगानं त्याची दखल घेतली आणि उजव्या कट्टरवाद्यांनी रिहानावर अश्‍लाघ्य भाषेत टीका, टिप्पण्णी सुरू केली. सरकार किती घाबरलं आहे, याचा हा पुरावा. रिहानाच्या ट्विट अगोदर डिसेंबरमध्ये अमेरिकेतील सात कायदे प्रतिनिधींनी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पपिओ यांना एक पत्र पाठवून भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला होता. रिहाना, ग्रेटाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करूनही या दोघींचे पाठिराखे त्यांच्यासोबत राहिले. लाखां लोकांचे पाणी आणि वीज कापून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करणं, पोलिस आणि निमलष्करी दलांद्वारे बॅरिकेड्स लावून त्यांना अस्वच्छतेत राहायला भाग पाडणं, आंदोलक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचणं पत्रकारांसाठी अशक्य करून ठेवणं, ज्या समूहातील दोनेकशे जण गेल्या दोन महिन्यात गारठून मरण पावले आहेत त्या समूहाला शिक्षा करणं या कृती कशाच्या द्योतक आहेत. कायद्यांना विरोध करणारे सगळे श्रीमंत शेतकरी आहेत, अशी कुजबूज मोहीम उजव्यांनी चालविली आहे. पंजाबमधील शेतकरी कुटुंबाचं सरासरी मासिक उत्पन्न राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या ताज्या सर्वेक्षणानुसार 18 हजार 59 रुपये आहे. शेतकरी कुटुंबातील सदस्यांची सरासरी संख्या 5.24 आहे. तेव्हा सरासरी मासिक दरडोई उत्पन्न झालं 3,450 रुपये. संघटित क्षेत्रातील सर्वांत कमी उत्पन्नाहून हे उत्पन्न कमी आहे. हरयाणात हे आकडे सरासरी मासिक उत्पन्न 14 हजार 434 रुपये (शेतकरी कुटुंबाचे सरासरी आकारमान 5.9 व्यक्ती) आहे आणि दरडोई उत्पन्न सुमारे 2,450 रुपये. गुजरातमध्ये शेतकरी कुटुंबाचं सरासरी मासिक उत्पन्न 7,926 रुपये आहे आणि सरासरी आकारमान 5.2 सदस्य. म्हणजे सरासरी मासिक दरडोई उत्पन्न झाले 1,524 रुपये. यामध्ये सर्व स्रोतांतून मिळणार्‍या उत्पन्नांचा समावेश आहे. केवळ पिकातून मिळणार्‍या नव्हे; पशूपालन, कृषीबाह्य व्यवसाय, वेतन, रोजंदार्‍या वगैरे. कुजबूज मोहीम राबविणार्‍यांनी हे एकदा डोळ्याखालून घालावं.

Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10339,औरंगाबाद,365,क्रीडा,678,दखल,706,देश,4439,नाशिक,805,पुणे,742,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16444,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13687,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3710,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1552,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शक्तीशाली सरकार एवढं का घाबरलं?
शक्तीशाली सरकार एवढं का घाबरलं?
https://1.bp.blogspot.com/-NJD1PvG4CFI/YB6eC1ExwMI/AAAAAAABn-0/hzsbi1l2XvUpaZvJ4uO22dMXoFbo-JUDACLcBGAsYHQ/s320/New%2BVindo%2Blogo.jpg
https://1.bp.blogspot.com/-NJD1PvG4CFI/YB6eC1ExwMI/AAAAAAABn-0/hzsbi1l2XvUpaZvJ4uO22dMXoFbo-JUDACLcBGAsYHQ/s72-c/New%2BVindo%2Blogo.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_158.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_158.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content