नवी दिल्ली : अफगाणीस्थानपासून ते इराकपर्यंत मुस्लीम लोक आपसात लढून संपत आहेत. तिथे इतर धर्मांचे लोक नाहीत तरी देखील ते आपसात लढण्यात गुंग आह...
नवी दिल्ली : अफगाणीस्थानपासून ते इराकपर्यंत मुस्लीम लोक आपसात लढून संपत आहेत. तिथे इतर धर्मांचे लोक नाहीत तरी देखील ते आपसात लढण्यात गुंग आहेत. यातुलनेत भारतीय मुस्लीम अधिक सुखी आणि समाधानी आहेत. त्यामुळे मला भारतीय मुस्लीम असण्याचा अभिमान वाटत असल्याचे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले.
आझाद यांचा कार्यकाळ संपला असून सभागृहातील निरोपाच्या भाषणात ते बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चौघांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी आझाद यांनी देशभरातील मुस्लिम देशांचा दाखला देत प्रश्न उपस्थित केला. मी त्या नशीबान माणसांपैकी एक आहे, जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत. मला भारतीय मुस्लिम असल्याचा अभिमान आहे. जगात जर कुठल्या मुस्लिमांना अभिमान वाटायला हवा, तर तो भारतीय मुस्लिमांना वाटायला हवा, असे आझाद यांनी सांगितले. यावेळी आझाद म्हणाले की, माझी नेहमीच अशी भूमिका राहली आहे की, आम्ही नशीबवान आहोत. स्वातंत्र्यानंतर माझा जन्म झाला. पण, आज गुगलवर वाचतो. यू ट्यूबवर बघतो. मी त्या नशीबवान लोकांपैकी आहे जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत. पण, जेव्हा मी वाचतो की पाकिस्तानात कशी परिस्थिती आहे. तेव्हा मला अभिमान वाटतो की, मी भारतीय मुसलमान आहे. इतकंच नाही तर मी असे म्हणेन की, जगात जर कोणत्या मुस्लिमांना अभिमान वाटायला हवा, तर तो भारतीय मुस्लिमांना वाटायला हवा असे आझाद यांनी सांगितले.