मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणावर विरोधी पक्षन...
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांना विमान नाकारणं हा प्रकार दुर्दैवी आहे. कुणाच्या मालकीची ही मालमत्ता नाही. माझ्या माहितीप्रमाणे जीएडीला पत्र दिलं होतं. तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडे हे पत्र पोहोचलं होतं पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं. आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.