$type=ticker$snippet=hide$cate=0

हर्षवर्धन पाटील खोटारडे : भरणे

 पुणे/प्रतिनिधी: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे खोटारडे असून गेली वीस पंचवीस वर्षे ते खोटे बोलत आहेत, असा आरोप सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री...

 पुणे/प्रतिनिधी: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे खोटारडे असून गेली वीस पंचवीस वर्षे ते खोटे बोलत आहेत, असा आरोप सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला. इंदापूर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांच्या सत्काराप्रसंगी भरणे बोलत होते.  ज्यांना मोठा अनुभव आहे, ते केंद्र सरकारचा निधी आणल्याचा दावा करतात. किती लबाड बोलायचे याला सीमा आहेत. तालुक्यातील माणूस किती खोटा असतो. लोकांना किती दिवस खोटे सांगायचे, असा सवाल भरणे यांनी पाटील यांना केला आहे. भरणे यांनी इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन असणार्‍या सरपंच, उपसरपंचाचा सत्कार केला. तुमच्याकडे 38 सरपंच होते, तर का ओळख परेड केली नाही, असा सवालही त्यांनी केला.

तालुक्याला गेली 20-25 वर्षे खोटे सांगायचे काम केले. तुम्हा


ला जनतेने विश्रांती घ्यायचा सल्ला दिलेला आहे. विश्रांती घ्या, निवडणुकीच्या काळात जनता ठरवेल, कुणाला मतदान करायचे, राष्ट्रवादीला की भाजपला जनतेला ठरवू द्या, असे भरणे म्हणाले. पाटील यांनी इंदापूर तालुक्यात भाजपच्या 38 ग्रामपंचायती निवडून आल्याचा दावा केला होता. इंदापूरच्या विकासासाठी 88 कोटींचा आराखडा तयार केला असल्याची माहिती भरणे यांनी दिली. गावाच्या विकासासाठी कुणालाही निधी कमी पडू देणार नाही, असे ते म्हणाले. इंदापूर तालुक्यातील विकासकामांच्या उद्गाटनाच्या कामांचे फोटो काढायचं ठरवले, तर पेपरचे पान कमी पडेल, असा टोला भरणे यांनी पाटील यांना लगावला. मी एवढी काम करतो; मात्र त्याचा फोटो राहतो बाजूला, मी जर फोटो काढला तर एक पान भरेल इतके फोटो मिळतील. चार वर्षे उद्घाटने केली, तरी दिवस कमी पडतील, असे नियोजन आहे, असे ते म्हणाले. इंदापूर तालुक्यातील सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीमध्ये 60 पैकी 38 ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व असल्याचा दावा पाटील यांनी केला होता. यावरुन भरणे यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला.


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10339,औरंगाबाद,365,क्रीडा,678,दखल,706,देश,4439,नाशिक,805,पुणे,742,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16444,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13687,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3710,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1552,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: हर्षवर्धन पाटील खोटारडे : भरणे
हर्षवर्धन पाटील खोटारडे : भरणे
https://socialimages.sakalmediagroup.com/sarkarnaama-prod/s3fs-public/news-story/cover-images/043harshawardhan_bharne_7may_f_3.jpg?yF0uuaYbM.O9.BH9VHmC5aS2QL_VymTp
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_187.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_187.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content