कराड / प्रतिनिधी : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांतर्गत, कापिल (ता. कराड) येथे खा. श्रीनिवास ...
कराड / प्रतिनिधी : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांतर्गत, कापिल (ता. कराड) येथे खा. श्रीनिवास पाटील यांच्या आग्रहातून महिला शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. घर संसार निट नेटका चालवत असताना दुसर्या बाजूने शेतामध्ये अविरत परिश्रम करून, शेतीला कल्पकतेची व आधुनिकतेची जोड देत कुटुंबाच्या प्रगतीचा हिस्सा बनलेल्या कर्तृत्ववान कृषीलक्ष्मींना सम्मानित करण्याची संधी श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मिळाली.
याप्रसंगी कराड, पाटण तालुका विभागातून पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या कृषीलक्ष्मींना सम्मानित करण्यात आले. कराड तालुक्यातील नूतनताई जगन्नाथ मोहिते (वहिनी), बाळूताई विठ्ठल ढेबे, छाया विजय यादव, विजयादेवी लक्ष्मण पवार, शांताबाईं सदाशिव यादव, भारती नागेश स्वामी, इंदुमती उत्तम पाटील, विद्या उदय पाटील, कमल शंकर घोडके, दिपाली सुधीर चिवटे व सुरेखा दिलीप गरुड यांना तर पाटण तालुक्यातील कुसुमताई बापूराव करपे, सुमित्रा विठ्ठलराव शिर्के, स्मिता मोहन कदम, विमल धोंडीबा झोरे, सुप्रिया प्रकाश पाटील, रोहिणी प्रकाश पाटील यांचा प्रगतशील महिला शेतकरी गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण माझ्या व श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या उपाध्यक्षा रचनादेवी सारंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निलमताई येडगे, महिला व बालकल्याण सभापती कमलताई कुर्हाडे, नगरसेविका नंदा भोसले, नगरसेविका गीतांजली पाटील, नगरसेविका आनंदी शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या वनिता देवकर, नरेंद्र लिबे, कापीलच्या सरपंच कल्पना गायकवाड, उपसरपंच धोंडीराम मोरे व कल्पवृक्ष समुहाचे अध्यक्ष भाऊसाहेब ढेबे, डॉ. महेंद्र भोसले तसेच पाटण व कराड तालुक्यातील आणि कापील व परिसरातील ग्रामस्थ व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.