मुंबई/प्रतिनिधी: भाजपने बांगला देशचया एका नागरिकाला उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचे युवक जिल्हाध्यक्षपद दिले आहे. पोलिसांच्या धाडीत हे उघ...
मुंबई/प्रतिनिधी: भाजपने बांगला देशचया एका नागरिकाला उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचे युवक जिल्हाध्यक्षपद दिले आहे. पोलिसांच्या धाडीत हे उघड झाले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून भाजपच्या या बांगला देशी कनेक्शनची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. एककीडे भाजपकडून त्यांच्या विरोधात बोलणार्यांना देशद्रोही ठरवले जात आहे; पण आता भाजपचे कार्यकर्तेच बांगला देशी असल्याचे उघड झाले आहे. बांगला देशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणार्या रुबेल जोनू शेख याने खोटी कागदपत्रे तयार केल्याची माहिती पोलिसांनी टाकलेल्या धाडीत उघड झाली. सयाच तरुणाला भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाध्यक्ष हे पद दिले. या युवकाने तयार केलेली त्याची सर्व कागदपत्रे ही बोगस असल्याचे उघड झाले आहे. देशद्रोहाची भाषा करणारे भाजपचे नेते मात्र या प्रकरणात गप्प का आहेत, असा सवाल तपासे यांनी केला. मुंबई व महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक बांधव भाजपला मानत नसून आता त्यांना बांगला देशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची नामुष्की आलेली आहे. बेकायदेशीररित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणार्या अशा भाजपच्या पदाधिकार्यांनी काही समाजविघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप घेणार का, असा सवालही त्यांनी केला आहे. मालवणी पोलिस ठाण्याच्या दहतवाद विरोधी पथकाने धाड टाकून रुबेल जोनू शेख (वय 24) या तरुणाला ताब्यात घेतले. तो बांगला देशाच्या जसूर जिल्ह्यातील बोवालिया गावचा रहिवासी असल्याचे उघड झाले. कोणत्याही कागदपत्राशिवाय त्याने 2011मध्ये भारतात प्रवेश करून मालाडमध्ये वास्तव्यास सुरुवात केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता पश्चिम बंगालच्या मलापोटा येथील उत्तर परगणा ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला त्याच्याकडे आढळला. तसेच नादिया जिल्ह्यातील हंसाखाली येथील त्याचा जन्म दाखला आणि नादियातीलच आदर्श हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखलाही त्याच्याकडे आढळला; मात्र मलापोटा ग्रामपंचायतीने शेखला कोणताही रहिवासाचा दाखला दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. ती शाळाच अस्तित्वात नसल्याचंही पोलिसांनी सांगितले.