मुंबई : वर्सोवा मधील यारी रोड परिसरातील सिलेंडरच्या गोदामाला आज सकाळच्या सुमारास आग लागली. या घटनेत ४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. येथील आ...
मुंबई : वर्सोवा मधील यारी रोड परिसरातील सिलेंडरच्या गोदामाला आज सकाळच्या सुमारास आग लागली. या घटनेत ४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. येथील आग आटोक्यात आली असून या ठिकाणी सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. परिसरात आग लागल्याने एकामागोमाग एक असे सिलेंडरचे स्फोट झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. एक किलोमीटर परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.