रेल्वेचे स्वतंत्र अंदाजपत्रक जाहीर करण्याचे थांबवल्यापासून सर्वसाधारण अंदाजपत्रकात रेल्वेच्या अंदाजपत्रकाचा तपशील समजत नाही. केंद्र सरकारन...
रेल्वेचे स्वतंत्र अंदाजपत्रक जाहीर करण्याचे थांबवल्यापासून सर्वसाधारण अंदाजपत्रकात रेल्वेच्या अंदाजपत्रकाचा तपशील समजत नाही. केंद्र सरकारने पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. रेल्वेसाठी एक लाख दहा हजार 55 कोटी रुपयांची तरतूद कमी वाटत असली, तरी आतापर्यंतच्या तरतुदीत ती सर्वांत कमी आहे. मेक इन इंडिया सक्षम करण्यासाठी उद्योगांचा वाहतुकीचा खर्च कमी करण्याचे उद्दीष्ट होते. ते किती साध्य झाले, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. आ कोळशावर चालणा-या गाड्या बंद झाल्या असल्या, तरी डिझेलवर चालणा-या गाड्यांचे प्रमाण जास्त आहे.
विद्युतीकरणावर त्यासाठी भर देण्यात आला होता. आता 46 हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर विजेवर गाड्या धावतील. राष्ट्रीय रेल्वे योजनेच्या मसुद्यावर अजून काम सुरू आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच फक्त उल्लेख करण्यात आला. नाशिक, नागपूरसह अन्य शहरांत मेट्रो प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. नवीन आणि आधुनिक डब्यांचा वापर वाढविण्यात येणार आहे. चेन्नई मेट्रोच्या दुस-या टप्प्यासाठी हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. 550 स्थानकांवर वायफाय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. रेल्वे रुळांच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारले जातील. अर्थात ही घोषणा जुनीच आहे. भारतीय रेल्वेने भारतासाठी राष्ट्रीय रेल्वे योजना तयार केली आहे रेल्वेसाठी जी एक लाख दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, त्यापैकी एक लाख सात हजार कोटी रुपये भांडवली खर्चासाठी आहेत, हे एकदा लक्षात घेतले, की पायाभूत सुविधांवर सरकारचा कसा भर आहे, हे लक्षात येते. वेस्टर्न डेडिकेटेड फ्राईट कॉरिडोर (डीएफसी) आणि ईस्टर्न डीएफसी जून 2022 पर्यंत चालू होईल. त्यामुळे मालवाहतूक वेगाने होईल. खरगपूर ते विजयवाडा, पूर्व पश्चिम कॉरिडॉर भुसावळ ते खडगपूर ते डांकुनी आणि इटारसी ते पूर्व पश्चिम कॉरिडॉर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. उत्तर दक्षिण कॉरिडॉर विजयवाडापर्यंत नेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सविस्तर प्रकल्प अहवाल मागविला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी होईल. प्रवाशांना उत्तम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रशियाकडून तयार केलेले बिस्टाम एलएचव्ही कोच पर्यटक मार्गावर आणण्याचे त्यांनी जाहीर केले. गेल्या काही वर्षांत केलेल्या सुरक्षा उपायांचा चांगला परिणाम झाला आहे. स्वदेशी विकसित स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली वापरण्यात येणार असून मानवी चुकांमुळे होणारी रेल्वेची टक्कर टाळता येणार आहे.