नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील सैन्य माघारीच्या प्रक्रियेची बातमी देताना रशियन वृत्तसंस्था ‘तास’ने एक मोठा दावा केला आहे. जून 2020मध्ये गलवान ...
नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील सैन्य माघारीच्या प्रक्रियेची बातमी देताना रशियन वृत्तसंस्था ‘तास’ने एक मोठा दावा केला आहे. जून 2020मध्ये गलवान खोर्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात चीनचे 45 सैनिक ठार झाले, तर भारताचे 20 जवान हुतात्मा झाले असे तासने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीन दोघांनी सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू केली आहे.
काल चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सर्वप्रथम सैन्य माघारी सुरू झा
ल्याचे जाहीर केले होते. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत या संबंधी माहिती दिली. गलवान खोर्यातील संघर्षात आपले किती सैनिक ठार झाले, ते चीनने अद्यापही जाहीर केलेले नाही. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्यानेही काही माध्यमांनी गलवान खोर्यातील संघर्षात चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचे म्हटले होते. गलवानमधील या घटनेच्या सात ते आठ महिन्यानंतर आता दोन्ही देश तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी, आज संसदेत सांगितले. लडाखमध्ये चीन बरोबर सुरू असलेल्या सीमावादाच्या विषयावर ते बोलत होते. पँगाँग टीसओ सरोवराच्या भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली.
पँगाँग सरोवराच्या भागातील सैन्य तैनाती मुख्य कळीचा मुद्दा आहे. चीनने इथे फिंगर फोरपर्यंत सैन्य तैनात केल्याने वाद चिघळत गेला. चीन बरोबर सतत सुरू असलेल्या चर्चेतून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनार्यावरुन सैन्य माघारीवर सहमती झाली आहे. टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल असे त्यांनी सांगितले. जवळपास गेल्या वर्षभरापासून चीनची सेना सीमेवर गोंधळ घालत होती; पण शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली आहे. त्याचा पुरावा भारतीय लष्कराने दिला. चिनी सेना वादग्रस्त भागातून काढता पाय घेत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पँगाँग लेक हा भारतासाठी महत्वाचा आहे. चिनी सैन्याने याच तळ्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात सैन्य वाढवले होते. त्यातूनच दोन्ही देशात तणावपूर्व स्थिती निर्माण झाली. गेल्या नऊ महिन्यांपासून ही तणावाची स्थिती आहे. आताच्या चीनच्या माघारीने दोन्ही देशातला हा तणाव निवळण्याची चिन्हे आहेत.