लखनऊ : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या ताफ्याला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका पाठोपाठ अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्यात. ...
लखनऊ : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या ताफ्याला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका पाठोपाठ अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्यात. सुदैवाने या अपघातात प्रियांका गांधी यांना कोणतीही दुखापत झाली नाही. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उत्तर प्रदेशमधील रामपूर येथील नवरीत सिंग या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या अंत्य संस्कारासाठी प्रियांका गांधी आपल्या ताफ्यासह आज सकाळी रामपूरकडे रवाना झाल्या होत्या. प्रियांका यांच्या कारच्या वायपरमधील पाणी संपले होते. त्यातच कारची काच धुरकट झाल्याने समोरचे काही दिसत नव्हते. चालकाने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येत असलेल्या कार एकमेकांवर जाऊन आदळल्यात. या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, गाड्यांचे बरेच नुकसान झाले आहे.