पुणे/प्रतिनिधी : मावळमधील टाकवे गावातही ग्रामपंचायत निवडणूक पार पडली; मात्र निवडणुकीनंतर हे गाव अचानक चर्चेत आले आहे. कारण टाकवे गावातील नवन...
पुणे/प्रतिनिधी : मावळमधील टाकवे गावातही ग्रामपंचायत निवडणूक पार पडली; मात्र निवडणुकीनंतर हे गाव अचानक चर्चेत आले आहे. कारण टाकवे गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने जादूटोण्याचा प्रकार उघड झाला आहे. सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक घडला. टाकवे गावचे ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, भूषण असवले आणि ऋषिनाथ शिंदे यांची नावे लिंबावर लिहून लिंबाला खिळे ठोकण्यात आले आहेत.
ते खिळे मारलेले तीन लिंबू इंद्रायणी नदीतील पिंपळा
च्या झाडाला ठोकण्यात आले होते. ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर लिहून त्यात खिळे मारून लिंबू झाडाला ठोकून भीती पसरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल अविनाश असवले यांनी वडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सरपंच, उपसरपंच निवडप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हे कृत्य करण्यात आले असावे. जादूटोण्याचा प्रकार करून भीती निर्माण करण्याचा हा प्रयत्न असावा. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि समजात अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करणार्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारे समाजात अंधश्रद्धा पसरवणार्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.