मुंबई : जैन दाम्पत्याचे दागिने हिसकावून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात अखेर पोलिसांना यश मिळाले आहे. १० दिवसांपासून पोलीस आ...
मुंबई : जैन दाम्पत्याचे दागिने हिसकावून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात अखेर पोलिसांना यश मिळाले आहे. १० दिवसांपासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २४ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. भरवलाल जैन (६१) हे आपल्या पत्नीसोबत कामानिमित्त चेंबूर ला जात होते. त्यावेळी अॅक्टिव्हा गाडीवरुन आलेल्या दोन तरुणांनी भवरलाल जैन यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचले आणि पळण्याचा प्रयत्न केला. मात्र भवरलाल जैन यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. चोराने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. तरीही जैन यांनी त्यांचा पाठलाग केला परंतु चोर निसटले. अखेर हताश झालेल्या जैन यांनी गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली पण त्यांना तेथे काहीच पुरावा मिळाला नाही. त्यांनी तपास सुरू ठेवला. अखेर मुंबई क्राईम ब्रांचच्या गुन्हे शाखेला या प्रकरणी एक माहिती हाती लागली. त्यावरून तपास केला असता अख्तर इद्रीसी उर्फ जाँटी आणि अब्दुल खान उर्फ अज्जू रायडर या दोघांबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ आरोपींना शोधून काढून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे.