$type=ticker$snippet=hide$cate=0

अण्णाद्रमुक-भाजपमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु

चेन्नई : आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी केंद्रीय गृहराज्य मंत्री आणि सिकंदराबादचे खासदार गंगापूरम किशन रेड्डी आ...

चेन्नई : आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी केंद्रीय गृहराज्य मंत्री आणि सिकंदराबादचे खासदार गंगापूरम किशन रेड्डी आणि केंद्रीय परिवहन राज्य मंत्री जनरल व्ही के सिंह यांनी चेन्नई येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी पलानीस्वामी तसेच उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या निवास्थानी भेट दिली. सामाजिक अंतर आणि मुखकवच परिधान करून सामाजिक अंतर ठेवत मान्यवरांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुक आणि अण्णाद्रमुक-भाजपमध्ये जागावाटपावर चर्चा आणि मंथन केले. राज्यात भाजप आणि अण्णाद्रमुकने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. 


सत्ताधारी अण्णा द्रविड मुनेत्र कळगम (अण्णाद्रमुक) तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे जेष्ठ नेते एडप्पाडी के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात अण्णाद्रमुक निवडणूक लढविणार असून ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून अण्णाद्रमुकने विधानसभा निवडणुकीसाठी 11 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. यावेळी तामिळनाडू भाजपाचे प्रमुख डॉ एल मुरुगन, प्रभारी आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी प्रामुख्याने उपस्थित होते. गंगापूरम किशन रेड्डी आणि व्ही के सिंह यांना तामिळनाडू विधानसभा निवडणूक प्रभारी तसेच सहप्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. राज्यात 6 एप्रिल रोजी एकाच वेळी मतदान होणार आहे तर निकाल 2 मे रोजी लागणार आहे. आगामी तामिळनाडू विधानसभेची निवडणूक जयललिता यांच्या अनुपस्थित ही निवडणूक होणार आहे. 2016 साली जयललिता यांच्या नेतृत्वात अण्णाद्रमुकने मोठा विजय मिळवला होता. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे. 235 सदस्यांच्या तमिळनाडू विधानसभेत अण्णाद्रमुकचे 124 तर द्रमुकचे 97 आमदार आहेत. मात्र 2019 लोकसभा निवडणुकीत द्रमुक-काँग्रेस युतीने 39 पैकी 38 जागा जिंकल्या त्यात द्रमुकचे 24 खासदार आहेत. सध्या अण्णाद्रमुक कडे फक्त एक खासदार आहे. अण्णाद्रमुकच्या निष्कासित नेत्या आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या सहकारी व्ही के शशिकला यांच्या उपस्थितीने तामिळनाडूच्या राजकारणाला विशेष महत्व आणि उत्कंठा प्राप्त झाली आहे. जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत होत असलेल्या आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत व्ही के शशिकला यांच्या राजकीय भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आता सत्ताधारी अण्णा द्रविड मुनेत्र कळगम -अण्णाद्रमुक आणि एम के स्टालिन यांच्या द्रविड मुनेत्र कळगममध्ये थेट लढत आहेत. मक्कल निधी मैय्यामचे कमल हसन तसेच शशिकला यांच्या उपस्थितीने तामिळनाडूच्या राजकारणाला नवीन दिशा लाभणार आहे. अभिनेते आणि मक्कळ नीधी मैयमचे प्रमुख कमल हसन देखील तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना फारसे यश आले नाही. डिसेंबर महिन्यात अभिनेते आणि मक्कळ नीधी मैयमचे प्रमुख कमल हसन यांनी महत्वाची घोषणा केली. माध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले की, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मी नक्की निवडणूक लढविणार. कोणत्या विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविल याबबत नंतर घोषणा करील असे कमल हसन म्हणाले होते. 2018 साली स्थापन झालेल्या मक्कळ नीधी मैयमचे प्रमुख कमल हसन तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना फारसे यश आले नाही. लोकसभा निवडणुकीत मक्कळ नीधी मैयमचा 37 जागांवर पराभव झाला तर 1,613,708 मतांसह 0.26% टक्के मताधिक्य लाभले. कमल हसन आणि रजनीकांत चांगले मित्र असले तरीही राजकीयदृष्ट्या त्यांचे विचार भिन्न आणि टोकाचे आहेत. विविध विषयांवर कमल हसन यांनी अनेक वेळा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून रजनीकांत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक-मित्र आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतीक्षित राजकीय पक्षासंदर्भात तामिळनाडू सह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते मात्र आरोग्याच्या कारणाने राजकारणात सक्रीय न होण्याचा निर्णय सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतला आणि अनेक चाहते आणि नागरिकांची निराशा झाली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध चेन्नईत विरोध प्रदर्शन करण्यात आले तसेच निर्णय मागे घेण्याची मागणी उपस्थितांनी केली. राजकारणात न येण्याच्या निर्णयाविरोधात सुरु असलेल्या चाहत्यांच्या विरोध प्रदर्शनावर सुपरस्टार रजनीकांत यांनी प्रतिक्रिया देत नाराजी आणि दु:ख व्यक्त केले होते. ट्वीटरद्वारे एका अधिकृत पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना सुपरस्टार रजनीकांत म्हणाले, " माझे काही चाहते आणि रजनी मक्कळ रजनी मक्कल मंदरमच्या काही निष्काशित कार्यकर्त्यांनी चेन्नईत माझ्या राजकारणात न येण्याच्या निर्णयाविरोधात विरोध प्रदर्शन केले. मी माझा निर्णय घेतला आहे. माझी सर्वांना विनंती आहे की विरोध-प्रदर्शन वगैरे प्रकार करू नका. याचा मला त्रास होतो. "स्वतः रजनीकांत आपल्या राजकीय पक्षाची जाहीर घोषणा 31 डिसेंबरला करणार होते मात्र असे काही घडले नाही आणि आरोग्य कारणावरून त्यांनी आपला राजकीय प्रवेश रद्द केला. 2017 डिसेंबर महिन्यात राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत रजनीकांत यांनी दिले होते. डीएमकेने प्रशांत किशोर यांच्या आय-पॅक संस्थेसोबत करार केला आहे. प्रशांत किशोर आणि एम के स्टालिन एकत्र आल्यामुळे सर्वांचे लक्ष 2021 तामिळनाडू विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे.निवडणूकीत द्रविड मुनेत्र कळगमचे अध्यक्ष एम के स्टालिन विरुद्ध एडप्पाडी के पलानीस्वामी असा थेट सामना रंगणार आहे. माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुक प्रमुख जयललिता आणि माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक एम करुणानिधी या दोन दिगज्ज नेत्यांच्या अनुपस्थित ही निवडणूक होणार आहे. 

Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अण्णाद्रमुक-भाजपमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु
अण्णाद्रमुक-भाजपमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु
https://1.bp.blogspot.com/-vDIs3ilpDBc/YDom88N4W2I/AAAAAAABonU/q-VLrf2lnuEQBXfGsfysMa5GctZykFXPQCLcBGAsYHQ/s320/BJP.jpg
https://1.bp.blogspot.com/-vDIs3ilpDBc/YDom88N4W2I/AAAAAAABonU/q-VLrf2lnuEQBXfGsfysMa5GctZykFXPQCLcBGAsYHQ/s72-c/BJP.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_265.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_265.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content