देशातील पहिले पेपरलेस बजेट सादर करण्यात आले. अर्थमंत्र्यांनी ते मेड इन इंडिया टॅबलेटवरून वाचले. खासदारांनाही हे बजेट त्यांच्या मोबाइलवर मि...
देशातील पहिले पेपरलेस बजेट सादर करण्यात आले. अर्थमंत्र्यांनी ते मेड इन इंडिया टॅबलेटवरून वाचले. खासदारांनाही हे बजेट त्यांच्या मोबाइलवर मिळाले. या वेळच्या अर्थसंकल्पाचे मुद्रण झाले नाही. यापूर्वी वित्त मंत्रालयाच्या प्रेसमध्ये अथसंकल्पाचे मुद्रण होत होते. जवळपास शंभर कर्मचारी त्याच्याशी संबंधीत असायचे, अंदाजपत्रकाचे मुद्रण, सील होणे आणि बजेटच्या दिवशी डिलीव्हरी करेपर्यंत कुणालाही घरी जाता येत नव्हते. त्यांच्याजवळ इंटरनेट, मोबाईल सुविधा नसायची. या वर्षी कोरोनामुळे बजेटची सॉफ्ट कॉपी सादर करण्यात आली. शुक्रवारी सर्व खासदारांना इकॉनॉमिक सर्व्हेची सॉफ्ट कॉपी देण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.