$type=ticker$snippet=hide$cate=0

पुद्दचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळणार ; बहुमताआधीच दोन आमदारांचा राजीनामा

 पुडुचेरीः नायब राज्यपालांच्या आदेशानुसार काँग्रेसला सोमवारी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागत असतानाच काँग्रेसच्या एका आणि मित्रपक्षाच्या एका ...

 पुडुचेरीः नायब राज्यपालांच्या आदेशानुसार काँग्रेसला सोमवारी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागत असतानाच काँग्रेसच्या एका आणि मित्रपक्षाच्या एका अशा दोन आमदारांनी राजीनामे दिल्याने आता सरकार कोसळण्याची फक्त औपचारिकता उरली आहे. मुख्यमंत्री नारायणसामी यांना विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदरच पायउतार व्हावे लागणार आहे. 


काँग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारायणन आणि द्रमुकचे आमदार के. व्यंकटसन यांनी सभापती व्ही. पी. शिवाकोझुंडू यांना आपले राजीनामा सादर केले. आता राज्यात सत्ताधारी पक्षाच्या संख्याबळ 12 आहे आणि विरोधी आमदारांची संख्या 14 आहे. अशा परिस्थितीत व्ही नारायणसामी सरकारचे पतन निश्‍चित मानले जात आहे. काँग्रेसकडे विधानसभेच्या सभापतींसह नऊ आमदार आहेत, तर मित्रपक्षाच्या तीन आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि मित्रपक्षाच्या एका आमदाराने राजीनामा दिला आहे. त्यातील काही आमदार भाजपत गेले आहेत. व्ही.पी. शिवकोझुंडू यांनी काँग्रेस व द्रमुकच्या आमदारांच्या राजीनाम्यास दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, की मला दोन आमदारांचा राजीनामा मिळाला आहे. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी आणि विधानसभा सचिवांना मी ही माहिती दिली आहे. लक्ष्मीनारायणन यांनी राजीनामा दिल्यानंतर पुद्दुचेरी विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या 15 वरून नऊवर आली आहे. यापूर्वी राजीनामा देणार्‍यांमध्ये ए अ जॉन कुमार, ए नमसिवम, मल्लादी कृष्णा राव आणि ई थेपायनंथ यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे आमदार एन. धनवेलू यांना पक्षविरोधी कार्यात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. नमसिवम आणि थेपायनंथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, बाकीचे नेतेही लवकरच भाजपमध्ये सामील होऊ शकतात. त्याच वेळी द्रमुकच्या आमदारांची संख्या तीनवरून दोनवर आली आहे. नायब राज्यपालांनी 22 फेब्रुवारी रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. भाजपने ही बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली होती. चार आमदारांच्या राजीनाम्यानंतर नारायणसामी यांनी बहुमताचा दावा केला. पुद्दुचेरीचे नवीन उपराज्यपाल डॉ. टिमिलीसाई सुंदरराजन यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. तीन दिवसांपूर्वी राज्यपालांनी 22 फेब्रुवारी रोजी पुद्दुचेरी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी विशेष अधिवेशन होत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत विश्‍वासदर्शक ठरावावर मतदा होणार आहे. येथील सरकारचा कार्यकाळ आठ जून रोजी पूर्ण होणार आहे. या वर्षी एप्रिल-मेमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. तथापि, अद्याप तारीख निश्‍चित केलेली नाही.



राहुल नाही ठरले तारणहार

काँग्रेसच्या आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुद्दुचेरीत येऊन सभा घेतल्या; परंतु त्यांनाही सरकार वाचविता आलेले नाही. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला एकही आमदार निवडून आलेला नसताना आता त्यांना आयते पाच आमदार मिळाले आहेत. 


Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5734,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,187,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,29,satara,124,satara.,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10276,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,699,देश,4415,नाशिक,801,पुणे,724,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16291,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13510,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3656,विदेश,650,संपादकीय,1538,सातारा,3197,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पुद्दचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळणार ; बहुमताआधीच दोन आमदारांचा राजीनामा
पुद्दचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळणार ; बहुमताआधीच दोन आमदारांचा राजीनामा
https://img.dtnext.in/Articles/2021/Feb/202102052243196763_Modi-Bedi-have-hidden-agenda-of-merging-Pondy-with-TN-CM_SECVPF.gif
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_277.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_277.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content