$type=ticker$snippet=hide$cate=0

गोयल कृषितज्ज्ञ असल्याचे समजल्याने ज्ञानात भर ; शरद पवार यांचा टोला

बारामती/प्रतिनिधीः शेतकरी आंदोलनाचे गांभीर्य केंद्र सरकारला कळायला हवे. शेतकर्‍यांची अस्वस्था पाहून केंद्र सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी यामध...

बारामती/प्रतिनिधीः शेतकरी आंदोलनाचे गांभीर्य केंद्र सरकारला कळायला हवे. शेतकर्‍यांची अस्वस्था पाहून केंद्र सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालयला हवे होते; मात्र शेतकर्‍यांशी चर्चा करणारे रेल्वे मंत्री पियूष गोयल काही कृषितज्ज्ञ नाहीत. गोयल माझे चांगले मित्र आहेत; मात्र ते शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली, अशी कोपरखळी माझी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रेल्वे मंत्री पियू। गोयल यांना मारली.


बारामती येथे एका कार्यक्रमानंतर पवार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, की ज्यावेळी चार ते पाच राज्यातील शेतकरी ऊन, पाऊस थंडीमध्ये रस्त्यावर येऊन आंदोलन करतात, त्या वेळी सरकार संवेदनशील असले पाहिजे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी यांच्यासारख्या वरिष्ठ मंत्र्यांनी शेतकर्‍यांशी चर्चा करायला हवी. नवीन कृषी कायद्याची चर्चा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 2003 मध्ये सुरू झाली. त्यानंतर 2004  मध्ये मी केंद्रीय कृषिमंत्री असताना या कृषी कायद्यासंदर्भात अभ्यास करून मसुदा तयार करण्यासाठी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नऊ राज्यांच्या कृषिमंत्र्यांची एक समिती नेमण्यात आली. हा मसुदा तयार झाल्यानंतर या कायद्यांसंदर्भात राज्यांनी विचार करावा, यासाठी तो मसुदा राज्यांना पाठवण्यात आला; मात्र 2014 मध्ये नवीन सरकार आल्यानंतर एकदम कायदा तयार करून संसदेत आणला, गोंधळात मंजूर केला. 

कोणताही कायदा तयार करताना त्यावर चर्चा होणे गरजेचे असते. घटनेप्रमाणे शेती संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार सबंधीत राज्यांना आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कृषी कायदा लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने एकदा राज्यांशी बोलायला हवे होते. हा विषय राज्यांचा असताना केंद्र सरकारने राज्यांना विश्‍वासात घ्यायला हवे होते; मात्र राज्यांना विश्‍वासात न घेता मोदी सरकारने हा कायदा तयार केला. त्याबाबत माझी तक्रार आहे. शेतीमध्ये जेथे शक्य होईल, तेथे सुधारणा करणे गरजेचे आहे. त्याबाबत काही तक्रारी आहेत. त्या चर्चेने सोडवता येतात, असेही पवार या वेळी म्हणाले.


Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5770,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,202,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,39,satara,147,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10334,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,706,देश,4439,नाशिक,805,पुणे,741,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16434,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13676,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3706,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1552,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: गोयल कृषितज्ज्ञ असल्याचे समजल्याने ज्ञानात भर ; शरद पवार यांचा टोला
गोयल कृषितज्ज्ञ असल्याचे समजल्याने ज्ञानात भर ; शरद पवार यांचा टोला
https://cdn.dnaindia.com/sites/default/files/styles/full/public/2020/12/07/941767-sharad-pawar-dna.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_279.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_279.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content