बंगळूरु : भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बंगळूरु दक्षिणचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी बंगळूरु येथे आयोजित 'ऐरो इं...
बंगळूरु : भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बंगळूरु दक्षिणचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी बंगळूरु येथे आयोजित 'ऐरो इंडिया' कार्यक्रमात गुरुवारी हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) द्वारा निर्मित भारतीय बनावटीच्या 'तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले. यावेळी आवश्यक असलेला संपूर्ण गणवेश परिधान करून तेजस्वी सूर्या यांनी 'तेजस' विमानातून उड्डाण केले. युवकांचे आकार्षण असलेले तेजस्वी सूर्या यांच्या तेजस अभियानाची सामाजिक माध्यमांवर जोरदार चर्चा होत असून त्यांच्या चित्रांना मोठा प्रतिसाद लाभतो आहे.
तेजस भारतीय वायुसेनेच्या 45 व्या स्क्वाड्रन ' फ्लाइंग ड्रैगर्स ' चा भाग आहे. लढाऊ विमानास को हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि एयरोनॉटिकल डेवलपमेंट एजेंसी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण आणि विकसित केले आहे. 2019 साली सप्टेंबर महिन्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'तेजस' विमानातून उड्डाण केले होते. तेजसमधून उड्डाण करणारे राजनाथ सिंह पहिले संरक्षण मंत्री आहेत. लाइट कॉम्बॅट एयरक्राफ्ट तेजस मध्ये सिंह यांनी जवळपास तीस मिनिटे प्रवास केला होता.