मुंबई : मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय सोमवारी सुरू होणार नसल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. राज्यातील महाविद्यालये १५ फ...
मुंबई : मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय सोमवारी सुरू होणार नसल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारी रोजी सुरु होणार होती. मात्र आता विद्यापीठे सुरू होणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबत राज्य सरकारने ३ फेब्रुवारी रोजी जाहीर केले होते. महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय जरी राज्य सरकारने दिला असला तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय देणार आहे.