मुबंई : पश्चिम महाराष्ट्रातील दोन बँकांवर कारवाई केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने नाशिकच्या इंडिपेडन्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले आहेत. या ...
मुबंई : पश्चिम महाराष्ट्रातील दोन बँकांवर कारवाई केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने नाशिकच्या इंडिपेडन्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले आहेत. या बँकेतन पैसे काढण्यावर आरबीआयने 6 महिन्यांसाठी बंदी घातली आहे.यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने सांगितले की, इंडिपेंडन्स बँकेमधून पैसे काढण्यास 6 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ठेवीदारांना बँकेच्या बचत किंवा चालू खाते तसेच अन्य कुठल्याही खात्यामधून जमा रकमेमधील कुठलीही रक्कम काढण्याची परवानगी नसेल. ठेवीदार हे ठेवींच्या बदल्यात कर्जाची फेड करू शकतात. त्यासाठीही काही अटी लागू असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने या बँकेवर अजून काही निर्बंध लादले. त्याअंतर्गत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कुठलेही कर्ज देऊ शकणार नाहीत. तसेच कुठल्याही कर्जाचे नुतनीकरण करू शकणार नाहीत. याशिवाय कुठलीही गुंतवणूक किंवा कुठल्याही रकमेची फेड करणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार बँक निर्बंधांनंतरही आपला बँकिंग व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवू शकेल. हे निर्बंध आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत सुरू राहतील. रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार निर्बंधांमध्ये दुरुस्तीही करू शकत असल्याचेही स्पष्ट करण्यात आलेय.