मुंबई : शेतकरी आंदोलनबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची आता चौकशी होणार आहे. केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची त...
मुंबई : शेतकरी आंदोलनबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची आता चौकशी होणार आहे. केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचं गुप्तहेर विभाग याची चौकशी करणार आहे. ग्लोबल सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी देखील ट्वीट केले होते. पॉप स्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्वीट केले होतं. सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केले की, "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही." बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.