परभणी,/प्रतिनिधी : पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्त्रोत असल्याने सर...
परभणी,/प्रतिनिधी : पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्त्रोत असल्याने सर्वांनी बांबू लावणे गरजेचे असून यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा. तसेच शेतकर्यांनी आपल्या शेतात बांबूची लागवड करीत चांगले उत्पन्न घ्यावे, असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व इंडिया बांबु फोरमचे संस्थापक सदस्य माजी आमदार पाशा पटेल यांनी गुरुवारी (दि.चार) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पाशा पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा, वन अधिकारी कच्छवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पाशा पटेल यांनी बांबूपासून विविध प्रकारच्या एक हजार आठशे वस्तू तयार होत असल्याचे नमूद करतानाच त्यांनी त्यातील काही प्रत्यक्ष दाखवल्या. यामध्ये बांबूपासून तयार करण्यात आलेला बांबू मुरबा, बांबू चहा, बांबू टूथब्रश, बांबू लोणचं, बांबूचा टॉवेल, बाबुचा तांदूळ, तसेच बांबपासून इथेनॉल, सीएनजी तयार करता येतो, असेही यावेळी स्पष्ट केले. पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्रोत असल्याने सर्वांनी बांबू लावणे गरजेचे आहे. शेतकर्यांनी आपल्या शेतात बांबू लावावाय यांपासून चांगले उत्पन्नसुद्धा घेऊ शकतात. पर्यावरणाचा र्हास होत चालला आहे. आपण जर लवकरच या बाबतीत महत्वाची पावले उचलली नाहीत तर पृथ्वी ही विनाशाकडे जाईल. त्यामुळेच जास्तीत जास्त बांबूची लागवड करावी., असे आवाह श्री.पटेल यांनी यावेळी केले.