संगमनेर/प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आज सोमवार दि.२२ रोजी येथील अमृता लॉन्स या मंगल कार्यालयावर प्रशासनाने ...
संगमनेर/प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आज सोमवार दि.२२ रोजी येथील अमृता लॉन्स या मंगल कार्यालयावर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. नाशिक पुणे महा मार्गावरील गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या अमृता लॉन्स या मंगल कार्यालयात नियमापेक्षा अधिक लोक एकत्र येऊन मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर न पाळता कोरोनाचे नियम ढाब्यावर बसवल्याचे प्रशासनास निदर्शनास आले. त्यामुळे गुंजाळवाडी ग्रामपंचायतीकडून लॉन्स मालकावर वीस हजार रुपयाचा दंड आकारला. यावेळी प्रांत अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यासह गुंजावाडी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.