$type=ticker$snippet=hide$cate=0

पंढरपुरात दिंड्या, वारकर्‍यांना बंदी ; माघी यात्रा; मठ, धर्मशाळांना नोटिसा

 पंढरपूर/प्रतिनिधीः कोरोनाच्या संकटामुळे पंढरपुरात माघी यात्रा कालावधीसाठी संचारबंदी जाहीर झाली आहे, तरीही राज्यभरातून दिंड्या पंढरपुरात दाख...

 पंढरपूर/प्रतिनिधीः कोरोनाच्या संकटामुळे पंढरपुरात माघी यात्रा कालावधीसाठी संचारबंदी जाहीर झाली आहे, तरीही राज्यभरातून दिंड्या पंढरपुरात दाखल होऊ लागल्याने पोलिसांनी शहरातील बाराशेपेक्षा जास्त मठ व धर्मशाळांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. 


कोरोनामुळे कोणत्याही दिंड्या अथवा वारकर्‍यांना पंढरपुरात प्रवेश नसल्याने या वारकर्‍यांचे निवासाचे ठिकाण असलेले शहरातील मठ व धर्मशाळांनी कोणत्याही भाविकाला निवासासाठी थांबवू नये, अशा स्वरूपाच्या या नोटिसा असून यात्रेपूर्वी शहरात दाखल झालेल्या हजारो भाविकांना बाहेर काढणे ही प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. यासाठीच सर्व धर्मशाळा व मठाना अशा नोटिसा दिल्या जात आहेत. माघी यात्रेत भाविकांना रोखण्यासाठी कोल्हापूर रेंजमधून जवळळपास 700 पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 80 अधिकारी असणार असल्याचे पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले. राज्यात कोरोनाचे वाढते संकट पाहून माघी यात्रेसाठी मंदिर दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. सध्या रोज येणार्‍या भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर दोन तासाला विठ्ठल मंदिर सॅनिटायझेशनला सुरुवात करण्यात आली आहे. माघी एकादशी 23 फेब्रुवारीला होणार असली, तरी विठ्ठल रविवार रात्री दहा वाजता भाविकांसाठी बंद होणार असून 24 तारखेला पहाटे सहा वाजता पुन्हा कोरोनाचे नियम पाळून भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाच्या हातावर सॅनिटायझर मारून आणि मुखपट्टी पाहूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. सुरुवातीला भाविकांची थर्मल स्कॅनिंग व प्लस ऑक्सिमीटरच्या साहाय्याने तपासणीदेखील केली जात आहे. माघी एकादशीच्या विठ्ठल व रुक्मिणी पूजेला केवळ पाच जणांना परवानगी दिली असून त्यांनाही मुखपट्टी व सामाजिक अंतर भान पाळण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.


Name

] ब्रेकिंग,862,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,5,Latest News,5780,letest News,599,Loksabha-2019,164,Maharashtra,211,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,156,satara.,4,solapur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10372,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,710,देश,4457,नाशिक,805,पुणे,753,बीड,1438,बुलडाणा,28,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16531,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13777,महाराष्ट्र सातारा,42,मुंबई,3734,विदेश,655,संपादकी,2,संपादकीय,1560,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पंढरपुरात दिंड्या, वारकर्‍यांना बंदी ; माघी यात्रा; मठ, धर्मशाळांना नोटिसा
पंढरपुरात दिंड्या, वारकर्‍यांना बंदी ; माघी यात्रा; मठ, धर्मशाळांना नोटिसा
https://mc.webpcache.epapr.in/mcms.php?size=large&in=https://mcmscache.epapr.in/post_images/website_404/post_19262051/thumb.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_352.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_352.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content