कोपरगाव शहर प्रतिनिधी- इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदण्या ऑनलाइन पध्दतीने नुतनीकरण कार्यालयातुन व्यवस्थित होत नसल्याचे निवेद...
कोपरगाव शहर प्रतिनिधी- इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदण्या ऑनलाइन पध्दतीने नुतनीकरण कार्यालयातुन व्यवस्थित होत नसल्याचे निवेदन
कोपरगाव इमारत बांधकाम कामगार असोसिएशन ने तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले.
या निवेदनात पुढे नमुद केले आहे कि बांधकाम कामगारांनी भरलेल्या ऑनलाईन नवीन नोंदणी मध्ये काही त्रुटी नसतांना विनाकारण अर्ज बाद केले जात आहे (१अ) उदाहरण अर्थ १सष्टेबर २०२० मध्ये भरलेले अर्ज तपासले गेलेले नाही पण पण १८ जाने २०२१ नंतरचा अर्ज तपासले गेले आहे, विनाकारण प्रत्येक अर्ज हा काही त्रुटी दाखवल्या जातात, १ वर्ष कालावधी पासुन काही नुतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन भरले गेलेत त्या अर्जाची प्रोफाइल तपासणी केल्यास त्यावर कोणती हि त्रुटी न दाखवता फक्त पेंडिंग दाखवले जाते हे कामगारांच्या हितावह नाही सदर नुतनीकरण अर्ज त्वरीत मंजुर करावे सदर अर्ज मंजुर न झाल्याने अनेक कामगार योजनांना कामगारांना मुकावे लागत आहे हा कामगारांवर अन्याय आहे .शासनाचा कामगार प्रमाण पत्रावर कोणता शिक्का मारावा हा निर्णय झालेला नाही तो हि त्वरीत करावा,ज्या कामगारांनी पुर्वी ऑनलाईन अगोदर नोंदणी केली आहे त्यांची नोंदणी सदर शासनाच्या अधीकृत प्रोफाइल वर त्यांचा फोटो आणि इतर बाबी दिसत नाही
तेव्हा सन्मानिय महोदय आपणास विनंती कि आमच्या निवेदनाचा लवकरात लवकर सहानुभूतीने विचार करावा अन्यथा आम्हास आंदोलन करावे लागेन असा विनंती पर इशारा दिला आहे या निवेदनाची प्रत
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री
बांधकाम कामगार मंत्री यांना हि पाठवली आहे निवेदनांवर
असोसिएशन च्या संस्थापक अध्यक्ष कृष्णा चोरगे उपाध्यक्ष कृष्णा आघाडे सचिव महेश मवाळ सहसचिव संतोष लांडगे संघटक कृष्णा ढोक खजिनदार दिलिप घुमरे प्रसिद्धप्रमुख विशाल अभंग कार्याध्यक्ष मधुकर खिल्लारी सहकार्याध्यक्ष दाऊद पठाण सदस्य गणेश डेंगळे विशाल आहिरे सह्या आहे