$type=ticker$snippet=hide$cate=0

सीतारामण यांनी अजित पवारांकडून मार्गदर्शन घ्यावे ; सुप्रिया सुळे यांचा सल्ला

 नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि बंधू अजित पवार यांचा दाखला दिला. केंद्रीय अर्थ...


 नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि बंधू अजित पवार यांचा दाखला दिला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना अजितदादांकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर यू टर्न घेतल्याच्या टीकेला अनेक दाखले देत मोदी यांच्यावरच त्यांनी बाजू उलटवली.

ासदारांचे 12 कोटी रुपये मोदी सरकारने परस्पर कापल्यावरून सुळे यांनी सरकारवर टीका केली. मला एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणायची आहे. केंद्रीय आणि महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. सीतारमण यांनी देशातील प्रत्येक खासदाराकडून बारा कोटी रुपये काढून घेतले, तेही त्यांना न विचारता. आता लोक आमच्याकडे खासदार निधीची मागणी करतात. ते तर मोदीजी घेऊन गेले. कुठून देऊ, अडीच वर्षे तर काहीच करता येणार नाही. असे सुळे म्हणाल्या. याच्या अगदी उलट, एकाही आमदाराकडून चारही पक्षांच्या बरे का, अजितदादांनी एक रुपयाही कमी केला नाही. प्रत्येक आमदाराला, अगदी विरोधीपक्षातीलही आमदारालाही दरवर्षी पाच कोटी रुपये मिळतील, हे आमच्या अर्थमंत्र्यांनी सुनिश्‍चित केले. हा भारताचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांच्यातील फरक आहे. दोन कोटीही दिले आणि नंतर तीन कोटीही दिले. कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. केंद्र सरकार वेळेवर जीएसटी देत नसतानाही राज्य सरकारकडून चांगली व्यवस्था केली जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी यांच्या सरकारवर आणि भाजपवर सुळे तुटून पडल्या. भाजपने जीएसटी, मनरेगा आणि आधार यूआयडीसारख्या योजनांना सुरुवातीला आक्रमक विरोध करून नंतर त्या स्वतःच योजना म्हणून राबवल्या होत्या. हा यूटर्न नव्हता का? असा सवाल त्यांनी केला. मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना शरद पवार यांचा नामोल्लेख केला होता. नव्या कृषी कायद्यांच्या धोरणांना पवार यांचा सुरुवातीला पाठिंबा होता, असे मोदी म्हणाले होते. त्यावर बोलताना सुळे यांनी लोकसभेत मोदी सरकारच्या यू-टर्नचा पाढाच वाचला. ‘मी पंतप्रधानांचे भाषण सुरु असताना या मुद्यावर प्रतिवाद करू शकले असते; पण आमची ती संस्कृती नाही. त्यामुळे मी आता त्याला उत्तर देत आहे’, असे सांगत मोदी सरकारच्या निर्णय माघारीवर बोट ठेवले.

चौकट


भाजपच्या भूमिकेवर टीकास्त्र

शरद पवार यांनी जे पत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, त्यात त्यांनी कृषी कायद्याच्या बदलांबाबत राज्यांना केवळ प्रस्ताव दिला होता आणि पूर्ण अभ्यास करूनच राज्यांनी त्यावर विचार करावा’, असे म्हटले होते. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएसटी करप्रणालीला विरोध केला होता. यूपीए सरकारने आरटीआय, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षणाचा हक्क, नरेगा, नवीन कॉर्पोरेट कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आणला होता. विकासाच्या कोणत्याही कायद्याला युपीएने एकतर्फी न आणता सर्वांशी चर्चा करून विकासाचे कायदे आणले. भाजपने सुरुवातीला या कायद्यांना विरोध करुन सत्तेत आल्यानंतर याच कायद्यांची अंमलबजावणी केली, अशा शब्दात सुळे यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11194,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,774,देश,4657,नाशिक,836,पुणे,934,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17944,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15343,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4324,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1695,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सीतारामण यांनी अजित पवारांकडून मार्गदर्शन घ्यावे ; सुप्रिया सुळे यांचा सल्ला
सीतारामण यांनी अजित पवारांकडून मार्गदर्शन घ्यावे ; सुप्रिया सुळे यांचा सल्ला
https://assets.telegraphindia.com/telegraph/bf4c13ae-760d-4766-b2f9-e1fb128b78d5.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_368.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_368.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content