पारनेर/प्रतिनिधी : रावसाहेब रोहोकले म्हणजे पारनेर तालुक्यातील ध्येयवेडे, संस्कारी, समाजकारणी. सातत्याने जिल्हाभर शिक्षकांच्या सुख दु:खात सहभ...
पारनेर/प्रतिनिधी : रावसाहेब रोहोकले म्हणजे पारनेर तालुक्यातील ध्येयवेडे, संस्कारी, समाजकारणी. सातत्याने जिल्हाभर शिक्षकांच्या सुख दु:खात सहभागी होणारा असा हा ध्येयवेडा शिक्षक नेता सततच्या जनसंपर्कामुळे शिक्षकी राजकारणात नेहमीच चर्चेत राहिला आहे .या ठिकाणी उपस्थित शिक्षक वर्ग खरोखर भाग्यवान आहेत कारण अशा संस्कारी शिक्षक नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहात असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुका शिक्षक परिषद व रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलताना काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. यावेळी पुढे बोलताना लंके म्हणाले, राज्यशासन वेळेवर अनुदान देते तरीही शिक्षकांचे पगार उशीरा होतात. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा परिषदेतील पगाराशी संबंधित अधिका-यांची लवकरच बैठक लावून सिएमपी प्रणालीच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील. तसेच केंद्रप्रमुख पदे पदोन्नतीने भरण्याबाबत तसेच बदल्यामध्ये पती पत्नी बरोबरच एकल शिक्षकावरही अन्याय होणार नाही. बदल्यांबाबत सर्वसमावेशक धोरण घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्याकरिता प्रयत्न करू असे सांगत लवकरच या प्रश्नावर ग्रामविकास मंत्र्याशी बैठक घडवून आणण्याकरिता मी स्वत: पुढाकार घेईल. असे सांगत शिक्षक परिषदेने आयोजित केलेल्या रक्तदाना सारख्या सामाजिक उपक्रमाचे लंके यांनी भरभरून कौतुक केले. प्रास्ताविक प्रवीण ठुबे यांनी केले.राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले,राज्य उपाध्यक्ष संजय शेळके यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न या ठिकाणी मांडले. यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ दाते, डॉ.बाबासाहेब बांडे, माजा सभापती सुदाम पवार, मिनाक्षी तांबे, अविनाश निंभोरे, राजू इनामदार, स्वाती झावरे, वैजिनाथ गिते, अल्ताफ शहा आदींनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमास पुण्याच्या रोटेरियन अर्चना गोजमगुंडे, गुरूमाऊली चे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, आर पी रहाणे, संजय शिंदे आदिंसह जिल्हाभरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. रोटरी क्लब पुणे,नोबेल हॉस्पिटल पुणे व शिक्षक परिषद आयोजित रक्तदान शिबिरात उपस्थित मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पोटे व ज्ञानेश्वर इंगळे यांनी केले तर आभार सुनिल दुधाडे यांनी मानले.
केवळ पारनेर तालुकाच नाही तर संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचा विश्वास निस्वार्थीपणे कार्य करणार्या रावसाहेबरोहकले गुरुजीं यांच्यावरच आहे हे पुन्हा आजच्या मेळाव्याने दाखवून दिले आहे.
प्रविण ठुबे, जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद