पुणे/प्रतिनिधी : पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या वास्तूचे संवर्धन ...
पुणे/प्रतिनिधी : पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या वास्तूचे संवर्धन करण्यासाठी ही वास्तू स्मारकामध्ये रुपांतरित करणे आवश्यक आहे; मात्र गेल्या दहा वर्षांपासून या प्रकरणात तोडगा निघाला नसल्याने सांस्कृतिक कार्य विभागाने संबंधित विभागाच्या अधिकार्यांच्या समितीचे गठन करावे, अशी सूचना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
भुजबळ या वेळी म्हणाले, की पुण्यातील भिडेवाडा ही वास्तू खासगी मालकीची आहे. तसेच या वास्तूत राहणार्या भाडेकरूंनी दहा वर्षापूर्वी न्यायालयात धाव घेतल्याने हा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी त्वरित समिती नेमण्यात यावी. या समितीमध्ये नगरविकास, सांस्कृतिक कार्य आणि महसूल विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा समावेश असावा. भिडेवाडा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी काय करता येईल तसेच याप्रकरणात न्यायालयाच्या बाहेर संमतीने काय करता येईल याबाबतची शक्यताही तपासण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.