मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, माझी...
मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, माझी कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ही ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली.माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी", असे ते म्हणाले आहेत. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंबईच्या घरातील दोघे कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे.