मुंबई : बजेटची उत्सुकता लागलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार खरेदी सुरू केली आहे. सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला आहे. निफ्टीने शतकी सलामी ...
मुंबई : बजेटची उत्सुकता लागलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार खरेदी सुरू केली आहे. सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला आहे. निफ्टीने शतकी सलामी दिली आहे. गेल्या आठवड्यात बाजारात प्रचंड विक्री झाली होती. यात गुंतवणूकदार चांगलेच होरपळून निघाले. सहा सत्रात सेन्सेक्सने जवळपास ३००० अंकांची घसरण अनुभवली. यात गुंतवणूकदारांचे सहा लाख कोटीचे नुकसान
झाले. गेल्या महिन्यात बीएसई आणि निफ्टी या दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांनी अलीकडील काळात उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्सने ५० हजारांचे शिखर गाठले तर निफ्टीनेही १४,७०० चा उच्चांक गाठला. मार्च २०२० मधील २५ हजारांच्या सर्वात निचांकी पातळीवर घसरल्यानंतर काही काळ अपवाद वगळता बाजारात निरंतर तेजीच सुरू आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५०४ अंकांनी वधारला असून तो ४६७९० अंकावर ट्रेड करत आहे. निफ्टीने १२७ अंकाची झेप घेतली असून तो १३७६४ अंकावर आहे. बँका, वित्त संस्था, ऑटो, एफएमसीजी, पॉवर या क्षेत्रात खरेदीचा ओघ आहे. आयसीआयसी बँक,एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इंडसइंड बंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, भारती एअरटेल, एल अँड टी, एसबीआय या शेअरमध्ये वाढ झाली आहे. तर बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, टेक महिंद्रा, टीसीएस या शेअरवर विक्रीचा दबाव आहे. पत मानांकन सुधारण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे, असे मत केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी आर्थिक पाहणी नंतर म्हटले होते.