श्रीनगर - जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला. राजौरी जिल्ह्यातील बुधाल भागातील खेत चाका भागात काश्मिर पोलीस आणि लष्कर...
श्रीनगर - जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला. राजौरी जिल्ह्यातील बुधाल भागातील खेत चाका भागात काश्मिर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने कारवाई करत शस्त्रसाठा जप्त केला. पाच ग्रेनेड लॉन्चर, ए. के असॉल्ट रायफल, ९४ राऊंन्डस, दोन पिस्तूल कारवाईत पोलिसांनी जप्त केले. डोंगराळ भागात दगडाच्या कपारीत शस्त्रे लपवून ठेवण्यात आली होती.