बीड/प्रतिनिधीः अरुण राठोडची नार्को चाचणी करा, अशी मागणी पूजाच्या चुलत आजीने केली आहे. पूजाच्या कुटुंबाीयांचे मोबाईल डिटेल्स तपासा, यात कोण द...
बीड/प्रतिनिधीः अरुण राठोडची नार्को चाचणी करा, अशी मागणी पूजाच्या चुलत आजीने केली आहे. पूजाच्या कुटुंबाीयांचे मोबाईल डिटेल्स तपासा, यात कोण दबाव टाकतो, हे स्पष्ट होईल, असे शांताबाई राठोड म्हणाल्या. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संशयित अरुण राठोडला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याच्या बातम्या असल्या, तरी त्याला पोलिस दुजोरा देत नाहीत. अरुणची नार्को चाचणी करा. पूजाला न्याय मिळाला पाहिजे, दोषी कोणीही असो. अरुण राठोड किंवा कोणीही, त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी शांताबाईंनी केली. अरुण आणि पूजाच्या घरच्यांचेही कॉल डिटेल्स तपासा. तपासणीनंतर स्पष्ट होईल की कोणाचे फोन येतात, कोणाचे दबावाचे फोन येतात का, कुणी ब्लॅकमेल किंवा देण्याघेण्याचे बोलायला फोन करते का, याकडे शांताबाई यांनी अंगुलीनिर्देश केला.
दोषींची नावे सगळ्यांना माहीत आहेत. एक जण ताब्यात घेतल्यावर त्याची सखोल चौकशी केल्याशिवाय पोलिसांनी सोडू नकये, अशी विनंती करून त्या म्हणाल्या, की वलास असो किंवा अरुण असो, अरुण नेत्यासोबत बोलतो मित्रासारखा, त्याचा रोल काय आहे? असा सवाल शांताबाई राठोड यांनी विचारला.पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुणला ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुणची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.