सोलापूर : माघी यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांना पोलिसांनी मठाबाहेर काढू नये. अन्यथा वारकरी पोलिसांविरोधात एकत्रित येऊन रस्त्यावर उतरतील, असा...
सोलापूर : माघी यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांना पोलिसांनी मठाबाहेर काढू नये. अन्यथा वारकरी पोलिसांविरोधात एकत्रित येऊन रस्त्यावर उतरतील, असा गंभीर इशारा संतवीर बंडातात्या कराडकर यांनी पंढरपुरात दिला आहे. याबरोबरच प्रशासनाकडून संचारबंदीचा निर्णय उशिरा घेण्यात आला. त्यामुळेच यात्रेसाठी वारकरी येथे दाखल झाल्याचे सांगत कराडकरांनी याबद्दल प्रशासनालाच जबाबदार धरले आहे.
दरम्यान कराडकरांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ऐन माघी यात्रेच्या काळात पो
लिस आणि वारकरी असा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वेणुगोपाल आणि माधवी निगडे फाउंडेशनच्या वतीने दहा लाख रुपयांच्या दोन ई-रिक्षांचा लोकार्पण सोहळा रविवारी बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर पत्रकारांशी कराडकर यांनी संवाद साधला. पंढरपुरात माघी यात्रा मंगळवारी, २३ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे.