मुंबई/प्रतिनिधीः केंद्र सरकारच्या नव्या स्क्रॅपिंग पॉलिसीवर वाहतूकदारांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. राज्यात किमान दोन कोटी वाहने भंगारात ज...
मुंबई/प्रतिनिधीः केंद्र सरकारच्या नव्या स्क्रॅपिंग पॉलिसीवर वाहतूकदारांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. राज्यात किमान दोन कोटी वाहने भंगारात जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचे नवं धोरण वाहतूकदारांचे संसार उद्ध्वस्त करणारे आहे. त्यामुळे ते मागे घ्यावे, अशी मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केली आहे.
केंद्र सरकारच्या नव्या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे मालवाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. या धोरणानुसार 1
5 वर्षांवरील व्यावसायिक वाहने आणि 20 वर्षांवरील खासगी वाहने भंगारात काढावी लागणार आहेत. त्यामुळे हजारो मालवाहतूकदारांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने व्यक्त केली. या धोरणाचा पुनर्विचार करावा, अन्यथा देशभर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
पुणे आणि पिंपरीचा विचार केला तर दोन्ही शहरांची वाहनसंख्या सुमारे 61 लाख आहे. त्यात दुचाकींचे प्रमाण अधिक आहे. त्यापैकी जवळपास 20 टक्के म्हणजे 13 लाखाच्या आसपास वाहने भंगारात निघणार आहेत. त्यामुळे पुणेकरांनीही या निर्णयावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. जुनी वाहने शहरातल्या मोक्याच्या जागांवर वर्षानुवर्षे पडून असतात. नव्या धोरणामुळे या जागा मोकळ्या होतील. शिवाय 25 ते 30 लाख गाड्यांच्या भंगाराचा योग्य वापर करता येईल, अशा शब्दांत परिवहन आयुक्तांनी नव्या धोरणाचे स्वागत केले. अनेकांनी या नव्या धोरणाचे स्वागत केले, तर काहींनी विरोध केला आहे.