नवी दिल्ली : दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण निर्माण झाल्यास त्यांना रायटर देण्यापासून रोखता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालया...
नवी दिल्ली : दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण निर्माण झाल्यास त्यांना रायटर देण्यापासून रोखता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे युपीएससीसह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये दिव्यांगांना रायटर घेता येणार आहे.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने म्हंटले की, दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणींमुळे परीक्षेचा पेपर लिहीता येत नाही. त्यामुळे त्यांची संधी नाकरात येणार नाही. यूपीएससीसह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना संधी मिळाली पाहिजे. त्यांना सर्व स्पर्धा परीक्षामंध्ये रायटर देण्यात यावा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने केद्र सरकारला दिला आहे. न्यायालयाने दिव्यांग विद्यार्थ्यांना रायटर देण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आणि नियम तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. या कालावधीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा देण्याच्या अधिकारांचे सरक्षण करण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक ती निवास सुविधा पुरवण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केलेय.स्पर्धा परीक्षांसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना रायटर देण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय क्रांतिकारी ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना दिव्यांग व्यक्तींमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावित असेही न्यायालयाने सांगितले आहे.