कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील एका गावात अंध व मतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिस ठाण...
कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील एका गावात अंध व मतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश औटी, कराड यांच्या न्यायालयामध्ये खटला चालू होता. न्यायालयाने याप्रकरणी आरोपीस दोषी धरून 1 वर्ष 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत सरकारी वकिलांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील एका गावात अंध व मतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुलीच्या आजीने आरोपी विरुध्द कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार आरोपीविरुध्द येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश औटी, कराड यांच्या न्यायालयामध्ये खटला चालू होता. त्याकामी सरकार पक्षातर्फे महत्वाचे चार साक्षीदार तपासण्यात आले. झालेल्या साक्षीपुराव्यावरुन व सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. मिलींद कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश औटी यांनी आरोपीस दोषी धरून याप्रकरणी आरोपीस 1 वर्ष 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. मिलींद व्ही. कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. या कामी कराड तालुका पोलिस स्टेशनचे तपासी अंमलदार सपोनि सौ. व्हि. पी. वंजारी यांनी तपास केला.