$type=ticker$snippet=hide$cate=0

अखेर पुद्दुचेरी हातचे गेले!

पुदुच्चेरी : केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेेरीत काँग्रेस-डीएमके आघाडीचे सरकार कोसळले. विधानसभेत व्ही नारायणसामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपय...

पुदुच्चेरी : केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेेरीत काँग्रेस-डीएमके आघाडीचे सरकार कोसळले. विधानसभेत व्ही नारायणसामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपला राजीनामा नव्या नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे सोपवला आहे. 


 विधानसभेत चर्चेदरम्यान मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी बहुमताचा केलेला दावा फोल ठरला. विधानसभेत विश्‍वासदर्शक ठरावादरम्यान काँग्रेस आणि डीएमकेच्या आमदारांनी ’वॉक आऊट’ करत सदनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, येत्या काही महिन्यांत पश्‍चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांसोबतच पुद्दुचेेरीमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधीच व्ही नारायणसामी सरकार कोसळले. विधानसभेत विश्‍वासदर्शक ठरावावर बोलताना मुख्यमंत्री व्ही नारायणसामी भावूक झाले. त्यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळातील आव्हाने सदनात मांडली. सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही शेतकर्‍यांचे सहकारी कृषी कर्ज माफ केले. छोट्या शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान मोदी सहा हजार रुपये देत होते, तर आम्ही 37,500 रुपये शेतकर्‍यांना दिले, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी नायब राज्यपाल किरण बेदी यांनी आम्हाला थोपवण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु आम्ही जनतेच्या हितासाठी काम करत राहिलो, असेही त्यांनी या वेळी म्हटले. काँग्रेसने 2016 मधील निवडणुकीत 15 जागांवर विजय मिळवला होता. डीएमकेच्या तीन आमदारांनी काँग्रेसला समर्थन जाहीर केले होतं. यातील डीएमकेच्या आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराने रविवारी राजीनामा दिला. त्यानंतर नारायणसामी सरकारवर बहुमत सिद्ध करण्याचा दबाव वाढला होता.







Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5763,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,197,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,38,satara,141,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10326,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,705,देश,4439,नाशिक,805,पुणे,741,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16426,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13666,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3703,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1550,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अखेर पुद्दुचेरी हातचे गेले!
अखेर पुद्दुचेरी हातचे गेले!
https://thefocusindia.com/wp-content/uploads/2021/02/SSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS-1170x694.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_483.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_483.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content