मुंबई: आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला उपस्थित करण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी...
मुंबई: आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला उपस्थित करण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांची सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत त्याला हा प्रश्न विचारला आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला सचिन तेंडुलकरनं ट्विटद्वारे उत्तर दिलं होते. त्यानंतर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणाऱ्यांनी सचिन तेंडुलकरनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापूर्वी भूमिका का घेतली नाही असा सवाल उपस्थित केला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सचिनला सल्ला दिला होता.