$type=ticker$snippet=hide$cate=0

जीवसृष्टीच्या शोधाचं पहिलं पाऊल

 मानवाला अंतराळाचं आकर्षण आहे. अंतराळात आपल्यासारखीच जीवसृष्टी आहे का, याचं कोडं उलगडण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. पृथ्वीवर वाढलेली लोक...


 मानवाला अंतराळाचं आकर्षण आहे. अंतराळात आपल्यासारखीच जीवसृष्टी आहे का, याचं कोडं उलगडण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. पृथ्वीवर वाढलेली लोकसंख्या आता तिच्या क्षमतेच्या बाहेर चालली आहे. अशा वेळी पृथ्वीवरची ही लोकसंख्या अन्यत्र कुठं स्थलांतरित करता येते का, याचा विचार राज्यकर्ते आणि शास्त्रज्ञ करीत आहेत. त्यासाठी चंद्र आणि मंगळ यांच्या वार्‍या सुरू केल्या आहेत. ’नासा’नं मंगळावर उतरविलेलं रोव्हर याच प्रयत्नाचा एक भाग आहे.


सामान्यांची स्वप्नं आणि शास्त्रज्ञांची स्वप्नं वेगवेगळी असतात. सामान्यांची स्वप्नं प्रत्यक्षात आली, नाही आली, तरी फारसा फरक पडत नसतो. शास्त्रज्ञांची स्वप्नं मात्र वेगळी असतात. कल्पनेच्या पलीकडं जाऊन त्याचा शोध घेतला जात असतो. शास्त्रज्ञांची स्वप्नं मानवाच्या कल्याणासाठी असतात आणि कल्पनेपलीकडचं शोधण्यात त्यांना जास्त रस असतो. पृथ्वीच्या बाहेर कुठं जीवसृष्टी आहे, याचं मानवाला कुतुहल आहे. त्यामुळंच चंद्र, मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेतला जात आहे. काहींनी आताच अंतराळात स्वतःचं घर असावं, असा प्रयत्न चालविला आहे. लोकांच्या या मानसिकतेचा गैरफायदा काही घेत असले, तरी वैज्ञानिकांना मात्र पृथ्वीशिवाय अन्यत्र कुठं जीवसृष्टी आहे का, याचं गूढ उकलायचं आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून अंतराळ मोहिमा राबविल्या जात आहेत. अमेरिकेतील अंतराळ संस्था ‘नासा’नं हाती घेतलेल्या या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा आता पार पडला आहे. 18 फेब्रवारी रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ’नासा’च्या पर्सिव्हियरन्स रोव्हरचं मंगळावर यशस्वी लँडिंग करण्यात आलं. येजेरो क्रेटर या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं आहे. भारताची मंगळयान मोहीम फसली असली, तरी अमेरिकेनं त्यात दोन पावलं पुढं टाकली आहेत. अर्थात भारताचे रोव्हर अजूनही मंगळावर आहेच. मंगळावरील जीवसृष्टीच्या पाऊलखूणा शोधण्यासाठी पृथ्वीवरून पाठवण्यात आलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरनं यशस्वीपणे पाऊल टाकलं. ’नासा’नं सात महिन्यांपूर्वी मंगळावर पर्सिव्हियरन्स रोव्हर पाठवलं होतं. या रोव्हरच्या लँडिंगबरोबरच अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे. ’नासा’नं मंगळावर पाठवलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरनं जमिनीवर उतरताच पहिलं छायाचित्र पाठवलं असून, ’नासा’नं ट्विटरवर पोस्ट केलं आहे. जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी हे रोव्हर मंगळावरील माती आणि दगडांचे नमुने घेऊन येईल. ‘पर्सिव्हियरन्स रोव्हर पुढील काही वर्ष मंगळावर राहणार आहे. या काळात जीवसृष्टी अस्तित्वात असल्याच्या खुणांचा शोध रोव्हर घेणार असून, मंगळावरून नमुने घेऊन पृथ्वीवर परत येईल. त्यामुळं भविष्यात माणसाचा मंगळावर जाण्याचा मार्ग खुला होईल,’ असं ’नासा’नं म्हटलं आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर उतरताच नासाच्या कॅलिफोर्नियातील जेट प्रपल्सन लॅबोरेटरीमधील सर्वांच्या चेहर्‍यावर आनंदाचं वातावरण दिसून आलं. ही मोहीम आतापर्यंतची प्रगत रोबॉटिक एक्सप्लोरर आहे. हे रोव्हर 29.55 कोटी मैलाचं अंतर कापून मंगळावर दाखल झालं आहे.  ’नासा’नं आपल्या ट्विटर हँडलवर मंगळावर पोहोचलेल्या रोव्हरचा फोटो शेअर केला आहे. तसंच, या फोटोला सुंदर कॅप्शनही दिली आहे. यामध्ये म्हटलं आहे, की कशश्रश्रे, ुेीश्रव. चू षळीीीं श्रेेज्ञ रीं ाू षेीर्शींशी हेाश. याशिवाय, ’नासा’नं रोव्हरच्या दुसर्‍या बाजूचा फोटोही शेअर केला आहे. यामध्ये या रोव्हरच्या ’रोबोटिक आर्म’ची म्हणजे हाताची सावली दिसते. सगळ्यांत चांगली बातमी म्हणजे हे यान अगदी व्यवस्थित आहे, असं या मोहिमेचे डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर मॅट वॉलेस यांनी सांगितलं. सहा चाकं असणारा हा रोव्हर आता पुढची दोन वर्षं मंगळावरचे दगड आणि पृष्ठभाग खणत इथं पूर्वी कधी जीवसृष्टी होती का, याचा शोध घेईल.

ज्या जागी हे येझरो विवर आहे, तिथं अब्जावधी वर्षांपूर्वी एक तलाव होता असा अंदाज आहे आणि जिथं पाणी असतं, तिथं जीवसृष्टी असण्याचीही शक्यता असते. मंगळावर उतरल्यानंतर - लँडिंगनंतरही पर्सव्हिअरन्स सुरक्षित असल्याचा सिग्नल नासाच्या कंट्रोल रूमला मिळालेला आहे. यापूर्वी अशा क्षणांनंतर एकमेकांना मिठ्या मारत, हाय-फाय देत जल्लोष केला जाई; पण कोरोनामुळं पाळण्यात येणार्‍या सावधगिरीमुळं या वेळी कंट्रोल रूममधल्या इंजिनिर्यसमध्ये पारदर्शक स्क्रीन्स लावण्यात आले होते. परिणामी त्यांना ’फीस्ट - बम्प’ वर समाधान मानावं लागलं. या कॅमेर्‍यांची लेन्स कव्हर अजून काढण्यात आलेली नाहीत आणि त्यांच्यावर लँड होताना धूळ बसलेली आहे; पण तरीही या फोटोंमध्ये रोव्हरच्या पुढं आणि पाठीमागं असणारा सपाट पृष्ठभाग दिसतो. ’नासा’ची ही मोहीम हाताळणार्‍या टीमचे प्रमुख अ‍ॅलन चेन यांनी सांगितलं, की हा रोव्हर चांगल्या सपाट जागी उतरला आहे. ही गाडी फक्त 1.2 अंशांनी झुकलेली आहे. आता हा रोव्हर चांगल्या ठिकाणी आहे आणि सुरक्षित आहे. या अमेझिंग टीमनं मंगळावर हा रोव्हर लँड करण्याच्या मार्गातल्या सगळया अडचणी आणि कठीण परिस्थितीवर मात केली. शिवाय कोव्हिडमुळं निर्माण झालेली आव्हानंही होतीच. मंगळ मोहीम राबवणार्‍या नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचे संचालक माईक वॉटकिन्स म्हणाले, की या मिशनचे पहिले काही दिवस खास असतील. कारण आपण पृथ्वी ग्रहाचा एक प्रतिनिधी मंगळ ग्रहावर अशा जागी उतरवला आहे. जिथं यापूर्वी कोणीही गेलेलं नाही. मंगळावर यान वा रोव्हर उतरवणं सोप नाही. ’नासा’नं यापूर्वी हे केलं असल्यानं त्यांच्याकडं यासाठीचा अनुभव असला तरी यासाठी किती काळजी घेण्यात आली हे पर्सव्हिअरन्स टीमनं सांगितलं. ’नासा’नं मंगळावर उतरवलेला एक टन वजनाचा हा दुसरा रोव्हर आहे. 2012मध्ये क्युरिऑसिटी नावाचा रोव्हर एका वेगळ्या विवरात उतरवण्यात आला होता. या लँडिगसाठी वापरण्यात आलेली रॉकेट क्रेडलची पद्धत पर्सव्हिअरन्ससाठीही वापरण्यात आली. पुढच्या काही दिवसांमध्ये आता कंट्रोलर्स या पर्सव्हिअरन्सवरील कोणतीही यंत्रणा लँडिंग दरम्यान बिघडली नसल्याची खात्री करतील. या पर्सव्हिअरन्सच्या शिडावर मुख्य कॅमेरा आहे. हे शीडही उंचावण्यात येईल. या रोव्हरला मंगळावर उतरण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरण्यात आलं, त्याऐवजी आता या रोबोला या परिसरामध्ये ड्राईव्ह करण्यासाठी सूचना देणारे सॉफ्टवेअर या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करण्यात येईल. यासगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या काही दिवसात पर्सव्हिअरन्स भरपूर फोटो काढेल. आजूबाजूची पृष्ठरचना नेमकी कशी आहे याचा अंदाज इंजिनियर्सना या फोटोंवरून घेता येईल. या पर्सव्हिअरन्समध्ये एक मिनी - हेलिकॉप्टर आहे. दुसर्‍या ग्रहावर उड्डाण करणारं हे पहिलं हेलिकॉप्टर असेल. हे हेलिकॉप्टर उडवून पाहण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यानंतरच हा रोबो त्याच्या मुख्य कामाला लागेल. उपग्रहांनी शोधलेल्या विविध डेल्टांचा हा रोबो अभ्यास करेल. डेल्टा म्हणजे नदीच्या मुखाशी असणारा नदीच्या गाळापासून तयार झालेला त्रिभुज प्रदेश. या येझरो विवराच्या त्रिभुज प्रदेशामध्ये कदाचित इथं अब्जावधी वर्षांपूर्वी असणार्‍या जीवांचे अवशेष असण्याची संशोधकांना आशा आहे. पर्सव्हिअरन्स या त्रिभुज प्रदेशातील नमुने गोळा करेल आणि मग नंतर विवराच्या कडेपाशी झाली. इथं कार्बोनेट खडक असल्याचं उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीत समजलं. पृथ्वीवरच्या अशा खडकांमध्ये अनेकदा जीवसृष्टीचे अंश अडकलेले मिळाले आहेत. या येझरो विवरामध्ये विविध प्रकारचे दगड आहेत. इथं पूर्वी कधीतरी जीव होते, याचे संकेत देऊ शकणारे चिकणमातीचं आणि कार्बोनेट खडकही यात आहेत. एकेकाळच्या या तलावाच्या काठाशी ’बाथटब रिंग’ पाशी असणार्‍या अंशांमध्ये पर्सव्हिअरन्सला पृथ्वीवर आढणारे स्ट्रोमॅटोलाईट्स मिळण्याचा अंदाज आहे. पर्सव्हिअरन्सनं गोळा केलेले सगळ्यांत विशिष्ट दगड हे लहान ट्यूब्समध्ये घालून मंगळाच्या पृष्ठभागावरच ठेवण्यात येतील. या दशकाच्या अखेरपर्यंत या ट्यूब्सपृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि युरोपीयन स्पेस एजन्सीनं मिळून एक अब्जावधी डॉलर्सची योजना आखली आहे. यामध्ये आणखी एक रोव्हर, मार्स रॉकेट आणि एका मोठ्या उपग्रहाच्या मदतीनं या येझरो विवरात गोळा करून ठेवण्यात आलेल्या गोष्टी पृथ्वीर आणल्या जातील. पर्सव्हिअरन्सला जर जीवसृष्टीचं अस्तित्त्वं खुणावणारे काही अंश मिळाले तर मग याचा पुढं सखोल अभ्यास केला जाईल.



Name

] ब्रेकिंग,862,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,5,Latest News,5780,letest News,599,Loksabha-2019,164,Maharashtra,211,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,156,satara.,4,solapur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,176,अहमदनगर,10382,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,711,देश,4461,नाशिक,805,पुणे,753,बीड,1438,बुलडाणा,29,बुलढाणा,878,ब्रेकिंग,16554,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13800,महाराष्ट्र सातारा,42,मुंबई,3746,विदेश,655,संपादकी,2,संपादकीय,1562,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: जीवसृष्टीच्या शोधाचं पहिलं पाऊल
जीवसृष्टीच्या शोधाचं पहिलं पाऊल
https://1.bp.blogspot.com/-i2J5_MRUjME/YDILkMoDCmI/AAAAAAABocw/rK61H0zu8mIdTjfsmaxSnNWSRPJn8SXNgCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-i2J5_MRUjME/YDILkMoDCmI/AAAAAAABocw/rK61H0zu8mIdTjfsmaxSnNWSRPJn8SXNgCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_487.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_487.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content