$type=ticker$snippet=hide$cate=0

शरद पवार यांची गुगली आणि घायाळ पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यातून कधी काय अर्थ निघेल, याचा नेम नाही. पवार कधी कधी अशी गुगली टाकतात, की आणि त्यानं ...



राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यातून कधी काय अर्थ निघेल, याचा नेम नाही. पवार कधी कधी अशी गुगली टाकतात, की आणि त्यानं कोण कधी पायचित होईल, याचा भरवसा नाही. त्यांच्या अशा गुगलीपासून वाचण्याचा अनेकजण प्रयत्न करतात; परंतु कधी कधी अनेकजण पवार यांना गुगली टाकण्याची स्वतः संधी देतात आणि बोल्ड होतात.

राजकीय नेत्यांच्या वक्तव्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. त्याचा भावार्थही घ्यायचा नसतो. बिटवीन द लाईन अर्थ शोधायचा असतो. काही नेत्यांच्या वक्व्याचा, त्यांच्या संकेताचा भल्याभल्यांना अर्थ लागत नाही. शरद पवार हे त्यापैकी एक. पवार यांच्या गुरूंना आणि शिष्यांनाही ते कधीच समजले नाहीत. शरद पवार कधी कोणती खेळी करतील, याचा नेम नाही. त्यांच्या खेळ्या भल्याभल्यांना समजत नाही. पवार जे बोलतात, त्यापेक्षा त्यांची कृती वेगळी असते. त्यांच्या बोलण्याचा आणि कृतीचा अर्थ लावणं वाटतं, तितकंसोपं नसतं. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पदावर कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा होण्याऐवजी हे पद कोणाला मिळणार, याची जास्त चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसकडं विधानसभेचं अध्यक्षपद, शिवसेनेकडं मुख्यमंत्रिपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडं उपमुख्यमंत्रिपद असं सत्तेचं समीकरण ठरलं असताना पहिल्या क्रमांकाचा पक्ष, दुसर्‍या क्रमांकाच्या पक्षाला विश्‍वासात न घेता तिसर्‍या क्रमांकाच्या पक्षाशी पदं वाटून घेण्याची चर्चा करीत असेल, तर सरकार स्थापनेत ज्यांची भूमिका महत्त्वाची आहे, ते शरद पवार ते कसं सहन करतील, असं वाटणं साहजिकच आहे. भारतीय जनता पक्षाची ऑपरेशन लोटस् ही मोहीम अजूनही थांबली नाही. त्यामुळं भाजपनं अशी काही चाल पुन्हा खेळली, तर ती चाल यशस्वी होऊ नये, म्हणून विधानसभेचं अध्यक्षपद आपल्याला हवं, असं शिवसेनेला वाटणं स्वाभावीक आहे; परंतु त्यासाठी सव्वा वर्षापूर्वी झालेल्या वाटाघाटीचं, विश्‍वासाचं काय असा प्रश्‍न पडतो. काँग्रेसकडून विधानसभेचं अध्यक्षपद पदरात पाडून घेताना काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्याचं घाटत असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस ते कसं सहन करणार? दोन उपमुख्यमंत्रिपदं तयार केली, तर अजित पवार यांचं महत्व कमी होणार यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ते कदापि सहन करणार नाही. काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद दिलं, तर फक्त पदाचा सन्मान राहील. अधिकार काहीच मिळणार नाहीत, हे स्पष्ट आहे. तरीही काँग्रेस या पदासाठी का आग्रही आहे, हे समजत नाही. अजितदादांच्या कार्यक्षमतेपुढं अन्य कुणी टिकणार नाही, हे खरं असलं, तरी मूळ मुद्दा राज्यात दोन उपमुख्यमंत्रिपदं तयार करण्यानं पदांचं अवमूल्यन होणार आहे. काँग्रेसमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसंच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात स्पर्धा आहे. अजित पवार पश्‍चिम महाराष्ट्रातून आले असल्यामुळं काँग्रेस विदर्भाला उपमुख्यमंत्रिपद देण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता शरद पवार यांनी लक्षात घेतल्या नसतील, असं थोडंच आहे. काँग्रेस आणि शिवसेनेनं आपल्यात पदं वाटून घेतली, तरी त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होणार असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस हे सहजासहजी होऊ देणार नाही. त्यामुळं तर शरद पवार यांनी विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त झालं आहे. आता पुन्हा एकदा तीनही पक्षांना एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल, असं सांगितलं आहे. पवार यांचं हे वक्तव्य अन्य दोन पक्षांना वठणीवर आणि जागेवर आणण्यासाठी पुरेसं आहे.

राज्यात तीन पक्षांचं सरकार असून तिघांनाही समन्वयानं ते चालवावं लागेल. पूर्वी  काँग्रेसला असं वाटत होतं, की राष्ट्रवादी  काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार चालवितात आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना आणि काँग्रेस आपल्याला एकटं पाडतात, असं वाटण्याचा संभव आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी त्यावर सर्वांत आधी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार यांनी अवघ्या तीन शब्दांत त्यावर भाष्य करून बॉम्बगोळा टाकला आहे. अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं. आता ते खुलं झालं आहे, असं पवार यांनी म्हटलं. पवार यांचे हे तीन शब्द म्हणजे ठाकरे सरकारमध्ये उलथापालथ होण्याचे संकेत असल्याचंही बोललं जात आहे. पवार यांनी प्रसारमाध्यमांशी ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारताना मोठा गौप्यस्फोट केला. काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष बदलताना काँग्रेसनं आमच्याशी चर्चा केली होती. अध्यक्षपद तिन्ही पक्षाचं असल्यानं आता ते खुलं झालं आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्ष कोण असणार, यावर पुन्हा चर्चा होणार आहे, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पवार यांनी अत्यंत मोजक्याच शब्दात; पण अत्यंत मुद्देसुद भाष्य केलं आहे. पवार यांची ही तीन वाक्यं काट्यासारखी टोकदार असल्यानं त्यामुळं आघाडीतल कोणता पक्ष घायाळ होणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत काँग्रेस आणि शिवसेनेत अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपदाची डील झाल्याची चर्चा होती; पण पवार यांच्या या वाक्यानं त्यात वेगळाच रंग भरला आहे. पवार यांनी अध्यक्षपद खुलं झाल्याचं सांगितल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसही या पदासाठी दावा करणार असल्याचं वरवर दिसत असलं, तरी अन्य दोन पक्षांना ते दबावाखाली ठेवण्याच्या रणनीतीचा भाग असल्याचं मानलं जातं. विधानसभा अध्यक्षपद आपल्यालाच मिळेल, या शिवसेनेच्या मनसुब्यावरही पवार यांनी बोळा फिरवला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये समझोता झाला असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळं विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती; मात्र पवार यांनी आता विधानसभा अध्यक्षपदासाठी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचा काँग्रेसचाही दावा केल्यानं काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाबाबत गुगली टाकण्यामागं पवार यांची नेमकी खेळी काय असेल, हे समजायला आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल. आघाडीतील सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला विधानसभा अध्यक्षपद आलं होतं; पण आता विधानसभा अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार असल्याची गुगली पवार यांनी टाकली आहे. त्यामुळं अध्यक्षपद कुणाला द्यावं, यावर चर्चा होणार, की अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडं द्यावं यावर चर्चा होणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याशिवाय ही चर्चा कुणामध्ये होणार? आणि कधी होणार? याबाबतची उत्सुकताही ताणली गेली आहे. सरकार स्थापन करताना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जशी चर्चा झाली होती. आताही याच तीन नेत्यांत चर्चा होणार आहे. काँग्रेसमध्येही विजय वडेट्टीवार विरुद्ध बाळासाहेब थोरात असा एक गट आहे. थोडक्यात पश्‍चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ असा हा वाद आहे. विशेष म्हणजे थोरात आणि वडेट्टीवार हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरलं. पटोले हे पहिल्यापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. पटोले यांनी आता राजीनामा दिल्यानं, त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी निश्‍चित मानली जात आहे; मात्र पटोले यांचा राजीनामा किंवा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती ही केवळ काँग्रेस पक्षापुरती मर्यादित बाब राहिलेली नाही. या घडामोडीचा परिणाम महाविकास आघाडीवर होत आहे. पटोले यांनी सोडलेलं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला देऊ केल्याची चर्चा आहे. त्याबदल्यात काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे. या केवळ चर्चाच आहेत; मात्र शिवसेना-काँग्रेसमध्ये जर खलबतं होत असली, तरी राष्ट्रवादी शांत कशी बसेल? सत्तास्थापनेच्या सूत्रानुसार काँग्रेसकडं विधानसभा अध्यक्षपद गेलं. ठरल्याप्रमाणं मुख्यमंत्रिपद शिवसेनेला तर उपमुख्यमंत्री, अर्थ, गृह ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. 2019 मधील विधानसभा निकालानुसार, भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा कमी होत्या; मात्र अपक्षांसह शिवसेनेनं आपलं संख्याबळ 60 पर्यंत वाढवलं, तरीही महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडं सर्वाधिक 16 मंत्रिपदं आहेत. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदासह 14 आणि काँग्रेसकडं विधानसभा अध्यक्षांसह 12 खाती आहेत. ही पार्श्‍वभूमी एकदा लक्षात घेतली, तर पवार यांची गुगली काँग्रेसनं विधानसभेचं अध्यक्षपद कायम ठेवावं, यासाठीच असल्याचं मानलं जातं.


Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5734,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,187,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,29,satara,124,satara.,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10276,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,699,देश,4415,नाशिक,801,पुणे,723,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16290,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13509,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3656,विदेश,650,संपादकीय,1538,सातारा,3197,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शरद पवार यांची गुगली आणि घायाळ पक्ष
शरद पवार यांची गुगली आणि घायाळ पक्ष
https://1.bp.blogspot.com/-feSzQVhNq-0/YB0o24xF5aI/AAAAAAABn8Y/Rt844VMR8dY5mLf0u7y9q4e5M7CjFWXhACLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-feSzQVhNq-0/YB0o24xF5aI/AAAAAAABn8Y/Rt844VMR8dY5mLf0u7y9q4e5M7CjFWXhACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_496.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_496.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content